हडपसरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड

By Admin | Published: March 6, 2017 08:09 PM2017-03-06T20:09:24+5:302017-03-06T20:09:24+5:30

एका सराईत गुंडाने तब्बल दहा ते बारा साथीदारांच्या सोबतीने एका तरुणाला मारहाण करीत रस्त्यावरील चारचाकी आणि दुचाकींची

Hadapsar gangrape, traffic congestion | हडपसरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड

हडपसरमध्ये टोळक्याचा धुमाकूळ, वाहनांची तोडफोड

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 6 - एका सराईत गुंडाने तब्बल दहा ते बारा साथीदारांच्या सोबतीने एका तरुणाला मारहाण करीत रस्त्यावरील चारचाकी आणि दुचाकींची तोडफोड केली. विशेष म्हणजे हा गुंड नुकताच्या खुनाच्या गुन्ह्यात सुटून बाहेर आला आहे. रविवारी संध्याकाळी घडलेल्या या प्रकारामुळे हडपसर परिसरात एएकच दहशत पसरली आहे.
याकूब उर्फ मुस्तफा शेख (वय 52, रा. म्हाडा कॉलनी, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रफुल राजा, गोट्या व आणखी एक अशा तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये जवळपास दहा ते बारा जण तोडफोड करीत असताना दिसत असतानाही गुन्हा मात्र तिघांवरच दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शेख आणि आरोपी पुर्वी हडपसरमधील म्हाडा कॉलनीमध्ये राहण्यास होते. शेख यांचा टुरिस्टचा व्यवसाय आहे. आरोपींपैकी काहीजण नुकतेच खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर बाहेर आले आहेत. यातील काहीजणांनी दोन दिवसांपुर्वी शेख यांना धमकावत पैशांची मागणी केली होती.
पैसे देण्यास नकार दिल्यामुळे आरोपींनी रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास शेख यांच्या घरामध्ये घुसून त्यांना हॉकीस्टीकने मारहाण केली. रस्त्यावर उभ्या असलेल्या मोटारी, आॅटो रिक्षा, दुचाकींची तोडफोड केली. जवळपास 15 मिनिटे हा प्रकार सुरु होता. या घटनेमुळे रहिवाशांसह लहान मुलांमध्येही भितीचे वातावरण पसरले आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शेख यांनी रात्री उशिरा पोलिसांकडे धाव घेतली तेव्हा पोललिसांना हा प्रकार समजला. याप्रकाराबाबत पोलीस ठाण्याचे अधिकारीच अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे. या गुंडांना पोलिसांचेच अभय असल्यामुळे त्यांची हिम्मत वाढल्याचा आरोप रहीवाशांकडून केला जात आहे.

Web Title: Hadapsar gangrape, traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.