महाविद्यालय परिसरातील टवाळखोरांवर कारवाई : हडपसर पोलिसांची मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2018 09:21 PM2018-09-08T21:21:20+5:302018-09-08T21:22:08+5:30

महाविद्यालयाच्या परिसरात तरुणींची छेडछाड करत थांबणाऱ्या २८ मुलांवर हडपसर पोलिसांनी कारवाई केली़.

Hadapsar Police Campaign against road romio at Hadapsar | महाविद्यालय परिसरातील टवाळखोरांवर कारवाई : हडपसर पोलिसांची मोहिम

महाविद्यालय परिसरातील टवाळखोरांवर कारवाई : हडपसर पोलिसांची मोहिम

googlenewsNext

पुणे : महाविद्यालयाच्या परिसरात तरुणींची छेडछाड करत थांबणाऱ्या २८ मुलांवर हडपसरपोलिसांनी कारवाई केली़. २२ मुलांना त्यांचेकडील मोटारसायकलीवर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई केली़. ६ अल्पवयीन मुलांच्या पालकांना बोलावून समज देण्यात आली़.  

             हडपसर भागातील एका महाविद्याालयाच्या बाहेर थांबणाऱ्या मुलांकडून छेडछाड करण्यात येत असल्याची तक्रार पालक तसेच शिक्षकांनी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांच्याकडे केली होती. त्यानंतर पोलीस निरीक्षक तांबे यांनी साध्या वेशातील पोलिसांची तीन पथके तयार करून त्यांना महाविद्याालयाच्या परिसरात थांबण्याच्या सूचना दिल्या होत्या.

             त्यानंतर साध्या वेशातील पोलिसांनी साधना विद्याालय, अण्णासाहेब मगर महाविद्यालय, एस. एम. जोशी महाविद्याालयाच्या परिसरात नजर ठेवली. या भागात काही मुले  दुचाकीवरून फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी काही जण शाळकरी मुलींचा पाठलाग करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला पकडले आणि थेट पोलीस ठाण्यात नेले. त्यांच्या पालकांना पोलीस ठाण्यात येण्याची सूचना देण्यात आली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, उपनिरीक्षक मंगेश भांगे, युसुफ पठाण, राजेश नवले, संपत औचरे, राजू वेगरे, प्रमोद टिळेकर, सैदोबा भोजराव, विनोद शिवले, नितीन मुंढे, अकबर शेख, नामदेव बंडगर, प्रशांत टोणपे, गोविंद चिवले आदी  सहभागी झाले होते. 

तक्रार करण्याचे आवाहन

पोलिसांनी हडपसर भागात महाविद्याालयाच्या परिसरात थांबणाऱ्या ५० मुलांवर कारवाई केली. त्यापैकी २८ मुले अल्पवयीन आहेत. अल्पवयीन मुलांकडे वाहन परवाना नसल्याने त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.  शाळा, महाविद्याालयाच्या परिसरात टवाळखोर मुलांवर यापुढील काळात कारवाई करण्यात येणार आहे. पालक तसेच शिक्षकांनी याबाबत तक्रार केल्यास तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे यांनी सांगितले.

Web Title: Hadapsar Police Campaign against road romio at Hadapsar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.