ऑनलाइन मतदार नाव नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात हडपसर टॉप तर जुन्नर फ्लॉप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2019 02:40 PM2019-04-02T14:40:36+5:302019-04-02T14:48:40+5:30

लोकसभेच्या मावळ मतदारसंघात शहरातील पिंपरी आणि चिंचवड तर शिरुर मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे.

Hadapsar Top and Junnar Flop in Online voter name registration at Pune district | ऑनलाइन मतदार नाव नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात हडपसर टॉप तर जुन्नर फ्लॉप

ऑनलाइन मतदार नाव नोंदणीमध्ये पुणे जिल्ह्यात हडपसर टॉप तर जुन्नर फ्लॉप

Next
ठळक मुद्देलोकसभा निवडणूक : ऑफलाइन पद्धतीनुसार दौंडला केवळ ३४० अर्ज दाखललोकसभा निवडणुकीसाठी जानेवारीमध्ये निवडणूक आयोगातर्फे प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध गतवर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून निवडणूक आयोगाने मतदारनोंदणी

- नारायण बडगुजर -  
पिंपरी : पुणे जिल्ह्यात विधानसभेचे २१ मतदारसंघ आहेत. यातील हडपसर मतदारसंघात ऑनलाइन पद्धतीने सर्वाधिक म्हणजे २७,७०८, तर जुन्नर मतदारसंघात केवळ ११४७ मतदारांची मतदार यादीत नाव नोंदणी झाली.ऑफलाइन अर्थात थेट अर्ज भरून देण्याच्या पद्धतीत जिल्ह्यात भोसरीत सर्वाधिक म्हणजे ६६६१ मतदारांनी नावनोंदणी केली. दौंड मतदारसंघात सर्वांत कमी म्हणजे केवळ ३४० मतदारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरून नावनोंदणी केली.  
लोकसभेच्या मावळ मतदारसंघात शहरातील पिंपरी आणि चिंचवड तर शिरुर मतदारसंघात भोसरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघ झोपडपट्टीबहुल आहे. त्यामुळे मागासवर्गीय मतदार येथे मोठ्या संख्येने आहेत. चिंचवड मतदारसंघ हिंजवडी आयटी पार्कला लागून आहे. त्यामुळे या मतदारसंघात आयटीयनची वास्तव्य अधिक आहे. अशीच परिस्थिती भोसरी मतदारसंघात आहे. तळवडे येथे सॉफ्टवेअर पार्क आहे. त्यामुळे या परिसरात तसेच मोशी परिसरातही आयटीयनची मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. हा परिसर भोसरी विधानसभा मतदारसंघात मोडतो. त्यामुळे या मतदारसंघातही मतदान यादीत ऑनलाइन पद्धतीने नाव नोंदणी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. 
पुण्यातील मगरपट्टा सिटी आणि परिसरात आयटी कंपन्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील कर्मचारी अर्थात आयटीयन हडपसर परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यामुळे या मतदारसंघात ऑनलाइन पद्धतीने मतदार यादीत नावनोंदणीवर येथील मतदारांनी भर दिल्याचे स्पष्ट झाले. 
लोकसभा निवडणुकीसाठी जानेवारीमध्ये निवडणूक आयोगातर्फे प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली. तत्पूर्वी गतवर्षी ३१ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम राबवून निवडणूक आयोगाने मतदारनोंदणी केली. त्यानंतर पुन्हा ऑनलाइन व ऑफलाइन मतदार नोंदणीसाठी जनजागृती केली. त्याला नवमतदारांनी प्रतिसाद देत नोंदणी केली. 

पुणे जिल्ह्यात विधानसभेचे २१ मतदारसंघ असून, त्यांची मतदार नोंदणीची आकडेवारी पुढील प्रमाणे :
आॅफलाईन मतदारनोंदणी (१ जानेवारी ते ३० मार्च २०१९)
जुन्नर - २३४४
आंबेगाव - २६५९
खेड आळंदी - ४५४९
शिरुर - २१५२
मावळ - २८८९
चिंचवड - ६२४८
पिंपरी - २७१५
भोसरी - ६६६१
हडपसर - ४८८४

आॅफलाईन मतदारनोंदणी (१ जानेवारी ते २५ मार्च २०१९)
दौंड - ३४०
इंदापूर - २९६०
बारामती - ३४४७
पुरंदर - २१७५
भोर - ५०९२
वडगाव शेरी - ४१५८
शिवाजीनगर - २५१७
कोथरुड - ४६३९
खडकवासला - ३८९७
पर्वती - ३९१३
पुणे कॅन्टोन्मेंट - ३२५८
कसबा पेठ - १४३४

----------------------

ऑनलाईन मतदारनोंदणी (१ ऑक्टोबर २०१८ ते ३० मार्च २०१९)
जुन्नर - ११४७
आंबेगाव - १४५०
खेड आळंदी - २३८०
शिरुर - १२३९०
मावळ - २८८६
चिंचवड - १९१४२
पिंपरी - ३४६७
भोसरी - ९२०१
हडपसर - २७७०८

ऑनलाईन मतदारनोंदणी (१ ऑक्टोबर २०१८ ते २५ मार्च २०१९)
दौंड - ५७३३
इंदापूर - १२७०
बारामती - १६४०
पुरंदर - ३३०४
भोर - २९४४
वडगाव शेरी - १४३९९
शिवाजीनगर - ३२५५
कोथरुड - ९८३६
खडकवासला - ९७५६
पर्वती - ३७०८
पुणे कॅन्टोन्मेंट - ३२८०
कसबा पेठ - २६५५

Web Title: Hadapsar Top and Junnar Flop in Online voter name registration at Pune district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.