दरोडा टाकून ट्रक लुटणारी हडपसरची 'कोयता गॅंग' जेरबंद; १७ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 07:11 PM2020-09-18T19:11:29+5:302020-09-18T19:12:06+5:30

चोरीला गेलेला ट्रक सासवड- नारायणपूर रोडवर उभा असून ट्रकमधील माल विक्री करण्यासाठी चौघे जण ग्राहकांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली..

Hadapsar's 'Koyata gang' arrested for robbing a truck; 17 lakhs27 thousands materials seized | दरोडा टाकून ट्रक लुटणारी हडपसरची 'कोयता गॅंग' जेरबंद; १७ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त

दरोडा टाकून ट्रक लुटणारी हडपसरची 'कोयता गॅंग' जेरबंद; १७ लाख २७ हजारांचा ऐवज जप्त

googlenewsNext
ठळक मुद्दे६ जणांना अटक, दोन अल्पवयीन मुलांचा समावेश; एक महिला फरार

पुणे : कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकून ट्रक लुटणाऱ्या हडपसर येथील कोयता गॅगला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यात ६ जणांना अटक केले असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांच्यातील एक महिला फरार आहे. 
अतुल बाबुराव गजरमल (वय ३०), गणेश उर्फ दादया विठ्ठल हवालदार (वय २०), लक्ष्मण ऊर्फ पंकज धनंजय जाधव (वय २०), समीर लियाकत पठाण (वय २२), तेजस बाळासाहेब खळदकर (वय २३), विनोद ऊर्फ भैया विठ्ठल आदमाने (वय २१, सर्व रा़ हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ त्यांच्या ताब्यातून १७ लाख २७  हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चौफुला ते मोरगाव रोडवरील पडवी गावाच्या हद्दीत रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी कारमधून येऊन एका ट्रकचालकाला कोयत्या धाकाने लुटले होते. यावेळी कपड्यांच्या धाग्यांचे १४६ बंडल, प्लास्टिकचे १२ रोल, ट्रक व ४ हजारांची रोख रक्कम असा १७ लाख २७ हजारांचा माल चोरला होता. चोरट्यांनी ट्रकचालक व त्याच्या सहकाऱ्याला पुसेगाव घाटात सोडून दिले होते. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
             या गुन्ह्याचा तपास करत असताना चोरीला गेलेला ट्रक सासवड नारायणपूर रोडवर उभा असून ट्रकमधील माल विक्री करण्यासाठी चौघे जण ग्राहकांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली.त्यानुसार पोलीस निरीक्षक पद्याकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, कर्मचारी सचिन गायकवाड, महेश गायकवाड, दत्तात्रय तांबे, निलेश कदम, प्रकाश वाघमारे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी ९ जणांनी मिळून गुन्हा केल्याचे कबुल केले. आरोपींपैकी अतुल गजरमल याच्याविरुद्ध पूर्वी जबरी चोरी, खंडणी मागणे, मारहाण करणे व खुनाचा प्रयत्न करणे, गणेश हवालदार याच्याविरुद्ध मारहाण करणे, दरोड्याच्या तयारीत मिळून येणे, समीर पठा याच्याविरुद्ध बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगणे, जबरी चोरी, मारहाण करणे, तेजस खळदकर विरुद्ध मारहाण करणे असे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Hadapsar's 'Koyata gang' arrested for robbing a truck; 17 lakhs27 thousands materials seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.