मांजरेवाडी परिसरात रानडुकरांचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 12:02 AM2018-11-11T00:02:07+5:302018-11-11T00:02:23+5:30
पिकांचे नुकसान : प्रतिकार करताच शेतकऱ्यांवरच करतात हल्ला
दावडी : खेड तालुक्यातील मांजरेवाडी, टाकळकरवाडी येथे रानडुकरांनी हैदोस घातला आहे. त्यामुळे शेतकºयांनी लावलेले कांद्याचे पीक धोक्यात आले आहे. या परिसरात रोज रानडुकरांचा धुमाकूळ पाहायला मिळतो. याबाबत अनेकदा तक्रार करूनही वनविभागाचे मात्र दुर्लक्ष झाले आहे. मांजरेवाडी येथील एक शेतकरी भगवान मांजरे यांच्या शेतात रानडुकरांनी धुमाकूळ घालून संपूर्ण कांदापिकाचे नुकसान केले आहे.
जवळपास दोन एकर शेतातील कांदापिकाचे नुकसान झाले आहे. मांजरेवाडी, टाकळकरवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतजमिनी डोंगरालगत आहेत. या परिसरात रानडुकरांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. रानडुकरांच्या टोळ्या या परिसरात फिरत आहेत.
शेतकऱ्यांनी घेतलेले कांदापिक, बटाटा, तसेच मकापिकाची कणसे रानडुकरे खाऊन नुकसान करीत आहेत. तसेच कधी भारनियमन असल्यास शेतकºयांना रात्रीच्या वेळी पिकांना द्यावे लागते. या रानडुकरांच्या टोळीच्या भीतीमुळे शेतकरी रात्रीचे पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. तसेच शेतकºयांनी प्रतिकार केला असता, ही रानडुकरे शेतकºयांच्याच अंगावर धावून येत आहेत. रानडुकरांच्या सततच्या त्रासामुळे या परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.
पिकांचे नुकसान
खेड तालुक्याच्या पूर्व भागात कांदा हेच प्रमुख पीक असताना कमी पाण्याच्या उपलब्धतेमुळे शेतकरी नगदी पिकांकडे वळत आहे. परंतु पीक परिपक्व होण्याच्या अवस्थेतच रानडुकरांनी संपूर्ण पिकाची नासाडी केली आहे.
वन्यप्राण्यांच्या त्रासापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुंपण करतो. त्यात मात्र एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यास वनविभाग शेतकºयाच्याच मानगुटीवर बसतो.
४शेतकºयांच्या तोंडचा घास काढून न घेता शासनाने वन्यप्राण्यांची योग्य दखल घेऊन त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकºयांनी केली आहे.