जिल्ह्यातील ३३ गावे हगणदरीमुक्त प्लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:17 AM2021-08-18T04:17:03+5:302021-08-18T04:17:03+5:30
पुण्यात स्वच्छता अभियानची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिला टप्पात २०१७ मध्ये गावे हगणदारीमुक्त करण्यात आली ...
पुण्यात स्वच्छता अभियानची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पहिला टप्पात २०१७ मध्ये गावे हगणदारीमुक्त करण्यात आली होती. स्वच्छ भारत मिशन टप्पा दोन अंतर्गत जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये वैयक्तिक स्वच्छतागृहांप्रमाणेच प्रमाणेच शाळा, अंगणवाडी व येणाऱ्या अभ्यांगतांकरीता स्वच्छतेच्या सुविधा राबिवण्यात आल्या. गावात सार्वजनिक ठिकाणी, शाळा, अंगणवाडी येथे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करून गावे शाश्वत स्वच्छ करण्यात येत आहे.
चौकट
ही गावे झाली हगणदरीमुक्त प्लस
आंबेगाव : राजेवाडी, बारामती : मेखळी, सांगवी, कटफळ. भोर : ससेवाडी, साळवडे व आपटी. दौंड : सहजपूर, भांडगाव. हवेली : गोऱ्हे बु. अष्टापूर. इंदापूर : चिखली, शहा, सपकळवाडी व कांदलगाव. जुन्नर : ठिकेकरवाडी, काळवाडी. खेड : कान्हेवाडी तर्फे चाकण, खरपूडी खु. मावळ : देवले, कडधे. मुळशी : भूगाव. पुरंदर : काळदरी, धालेवाडी. शिरुर : विठ्ठलवाडी, चिंचोली मोराची. वेल्हा : घोल, कोलंबी.
कोट
जिल्ह्यात स्वच्छतेचे कामांसाठी घनकचरा व्यवस्थापन व शोषखड्डा मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच गावे सन २०२१-२२ मध्ये हगणदरीमुक्त प्लस करण्यात येणार आहे.
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी