PMFBY | गारपीट, अवकाळीने झालेल्या नुकसानीची ७२ तासांत माहिती द्यावी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2022 04:29 PM2022-03-10T16:29:26+5:302022-03-10T16:32:53+5:30

राज्यात ७ ते ९ मार्चदरम्यान काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे...

hailstorm untimely damage should be reported within 72 hours agriculture department | PMFBY | गारपीट, अवकाळीने झालेल्या नुकसानीची ७२ तासांत माहिती द्यावी

PMFBY | गारपीट, अवकाळीने झालेल्या नुकसानीची ७२ तासांत माहिती द्यावी

googlenewsNext

पुणे: प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांनी विमा संरक्षित पिकाच्या गारपीट, अवेळी पाऊस आदी नैसर्गिक कारणाने झालेल्या नुकसानीची माहिती घटना घडल्यापासून ७२ तासाच्या आत नुकसानग्रस्त पिकाच्या फोटोसह आपल्या संबंधित विमा कंपनीकडे सादर करावी, असे आवाहन कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिकी अधिकारी विनयकुमार आवटे यांनी केले आहे.

हवामानशास्त्र विभागाने राज्यात ७ ते ९ मार्चदरम्यान काही ठिकाणी गारपीट, अवेळी पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे अशा घटना घडून विमा संरक्षित पिकांचे नुकसान झाले असल्यास अधिसूचित महसूल मंडळातील विमाधारक शेतकऱ्यांनी त्याची माहिती ७२ तासांच्या विहित कालमर्यादेत संबंधित विमा कंपनीकडे सादर करणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत (Pradhan Mantri Fasal Bima Yojana) सहभाग नोंदविलेल्या शेतकऱ्यांचे विमा संरक्षित क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन ढगफुटी किंवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग आदी घटनांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास नुकसानीच्या स्वरूपानुसार विहीत रक्कम शेतकऱ्यांना देय असते. सध्या रब्बी हंगाम सुरू असून यामधील गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, रब्बी कांदा पिकांना विम्याचे संरक्षण घेतले असल्यास आणि नुकसान झाले असल्यास नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळू शकेल.

नुकसानीबाबतची माहिती शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित विमा कंपनीला देण्यासाठी क्रॉप इन्शुरन्स अॅप, विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक, विमा कंपनीचा ई-मेल, विमा कंपनीचे तालुकास्तरीय कार्यालय, कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी कार्यालय, ज्या बँकेत विमा जमा केला ती बँक शाखा या पर्यायांचा वापर करता येईल, असेही आयुक्तालयाने

Web Title: hailstorm untimely damage should be reported within 72 hours agriculture department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.