गारपिटीमुळे फळबागांसह पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:10 AM2021-04-16T04:10:31+5:302021-04-16T04:10:31+5:30

पाईट: परिसरात बुधवारी रात्री झालेल्या गारपिटीमुळे फळबागांसह बाजारी, भुईमूग, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी ...

Hailstorms hit crops, including orchards | गारपिटीमुळे फळबागांसह पिकांना फटका

गारपिटीमुळे फळबागांसह पिकांना फटका

Next

पाईट: परिसरात बुधवारी रात्री झालेल्या गारपिटीमुळे फळबागांसह बाजारी, भुईमूग, कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेल्या आंबा पिकाचे नुकसान झाले असून वीटभट्ट्यांनाही फटका बसला आहे. दरम्यान, कृषी, महसूल विभागाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

पाईट परिसरातील कोये, धामणे, कुरकुंडी, तळवडे, रौंधळवाडी, किवळे या परिसरात बुधवारी रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात गारपिटीचा पाऊस झाला. यामध्ये आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला कांदा पीकही वाया गेले आहे. यामध्ये उन्हाळी बाजरीचे नुकसान झाल्याचे प्रमाण सर्वाधिक असून आणि काढणी योग्य झालेली बाजरी पीक भुईसपाट झाली अचानक रात्री सात वाजल्यानंतर वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतातच साठवून पडलेला कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामध्ये शेतकऱ्यांना तातडीने कोणती उपाययोजना न करता आल्याने नुकसानीचे प्रमाण सर्वाधिक आहे. गारपिटीची प्रमाण एवढे होते की तळवडे येथे रात्री पडलेल्या गारांचा थर सकाळी अकरा वाजेपर्यंत जशाच्या तसा होता.

पाईट परिसरामध्ये आंबा पीक घेणारे व शेतकऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून वर्षातून एकदा येणारे नगदी पीक काही दिवसातच काढणीसाठी आलेले असताना अवकाळी झालेल्या गारपिटीमुळे आंबा पिकाचे पूर्णपणे नुकसान झाले असून बहुतांश झाडांचे आंबे खाली पडले यामध्ये पडलेल्या आंबचा कोणताही उपयोग होणार नसल्याने या वर्षीचे फळबाग धारक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.

जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी प्रांताधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे कृषी विभागाने तातडीने पंचनामे करण्यासाठी महसूल विभागास तातडीने सूचना देण्याची मागणी केली आहे. काळामध्ये शेतकरी संकटात असताना अवकाळी झालेल्या गारपिटीने फळबाग धारक फळबाग धारक शेतकरी व उन्हाळी पीक घेणारे शेतकरी अडचणीत सापडले असून त्यांना तातडीने मदत करण्याची मागणी त्यांनी केली.

१५ पाईट

१५ पाईट १

Web Title: Hailstorms hit crops, including orchards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.