ऑक्सिजनची सुविधा न मिळाल्याने टाकळी हाजीत दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:09 AM2021-04-27T04:09:58+5:302021-04-27T04:09:58+5:30

हनुमंत जबाजी पवार व एकनाथ गोंविद जाधव असे निधन झालेल्या रुग्णांचे नाव आहेत . येथील हनुमंत जबाजी पवार यांना ...

Haji died due to lack of oxygen facility | ऑक्सिजनची सुविधा न मिळाल्याने टाकळी हाजीत दोघांचा मृत्यू

ऑक्सिजनची सुविधा न मिळाल्याने टाकळी हाजीत दोघांचा मृत्यू

Next

हनुमंत जबाजी पवार व एकनाथ गोंविद जाधव असे निधन झालेल्या रुग्णांचे नाव आहेत .

येथील हनुमंत जबाजी पवार यांना मंचर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातच त्यांचे निधन झाले. तर एकनाथ गोविद जाधव यांना तेथे नेण्यात आले. मात्र, रात्री तेथे जाऊन बेड उपलब्ध न झाल्याने पुन्हा घरी आले. त्यानंतर त्यांना बेडची शोधाशोध करीत शिरूर, नगर, अशी दवाखाने शोधत पुन्हा मंचर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले .मात्र वेळेत उपचार न मिळाल्याने निधन झाल्याचे त्यांचा मुलगा दत्ता जाधव यांनी सांगितले .

डॉ. बिक्कड म्हणाले की, आज ५६ रुग्णांची कोरोना टेस्ट घेतली. त्यापैकी ३१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्णांची संख्या वाढत चालली असल्याने कोविड सेंटरमध्ये जागा मिळत नाही. तसेच ऑक्सिजन भरून मिळत नसल्याने खासगी डॉक्टर दाखल करून घेत नाही.

Web Title: Haji died due to lack of oxygen facility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.