‘स्वच्छंदी’चे आगळेवेगळे हळदी-कुंकू

By Admin | Published: January 21, 2016 01:11 AM2016-01-21T01:11:10+5:302016-01-21T01:11:10+5:30

‘‘ग्रामीण भागातील महिला आपली नेहमीची कामे करून स्वत:साठी खास वेळ काढून सामाजिक भान जपत स्वत:च्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करीत आहेत

Haldi-Kukku of 'Swadanchi' | ‘स्वच्छंदी’चे आगळेवेगळे हळदी-कुंकू

‘स्वच्छंदी’चे आगळेवेगळे हळदी-कुंकू

googlenewsNext

राजुरी : ‘‘ग्रामीण भागातील महिला आपली नेहमीची कामे करून स्वत:साठी खास वेळ काढून सामाजिक भान जपत स्वत:च्या इच्छेनुसार जगण्याचा प्रयत्न करीत आहेत. हा एक सकारात्मक विचार आहे. महिला सबलीकरण आणि सक्षमीकरण आणि आत्मविश्वासवृद्धी या त्रिसूत्रीचा आपण उपयोग करून आपल्यासोबत कुटुंबाचा विकास कसा साधू शकतो, आज गावागावात समाजाला दिशा देण्यासाठी स्वच्छंदी कट्ट्यांची गरज आहे,’’ असे गौरवोद्गार जुन्नरच्या गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी राजुरी येथे काढले.
नम्रता हाडवळे यांनी राजुरी येथील महिलांना एकत्रित करून स्थापन केलेल्या स्वच्छंदी कट्ट्याच्या वतीने हळदी-कुंकवाचा समारंभ आयोजिण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जुन्नरच्या विकास अधिकारी नम्रता जगताप उपस्थित होत्या.
जगताप म्हणाल्या, ‘‘महिलांनी कसलाही भेदभाव न ठेवता स्वत:ला प्रगत करावे. स्वच्छंदी कट्टा ही तुमची स्वत:ची अस्मिता असून ही अस्मिता दिवसेंदिवस वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहा.’’ महिलांच्या सहभागाबद्दल तसेच नेहमीच्या संक्रांत वाणाला फाटा देऊन सामाजिक जबाबदारी जपल्याने सर्वांचेच कौतुक केले. महिलांना एकत्रित येऊन आपण काय करू शकतो, याची उदाहरणे सांगितली. स्वच्छंदी कट्ट्यासारखी संकल्पना ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात राबविली जावी आणि त्यात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
गणपती महोत्सवापासून, ग्रामीण भागातील महिलांनी स्वत:साठी व्यक्त होण्याचे व्यासपीठ म्हणून सुरू केलेला स्वच्छंदी कट्टा समाजापुढे एक वेगळाच आदर्श घेऊन आला आहे.
मकरसंक्रांत हा खास महिलांचा सण, मग त्यात ठिकठिकाणी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम होत असतात. महिलावर्गही मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभागी होत असतात. नुसत्याच सहभागी न होता, संक्रांतीचे वाण म्हणून काही भेटवस्तू एकमेकीला देण्याचाही प्रघात आहे.
पण काळासोबत या कार्यक्रमाचे स्वरूप बदलत चालले आहे. संक्रांतीचे वाण म्हणून एकमेकीला दिल्या जाणाऱ्या वस्तू या बऱ्याचदा निरुपयोगी आणि निकृष्ट दर्जाच्या असतात. आपला मोठेपणा दाखविण्यासाठी अवास्तव साधनसंपत्तीचा दुरुपयोगच जास्त झाल्याचे पाहायला मिळते.’’
(वार्ताहर) राजुरी येथील स्वच्छंदी कट्ट्याचा पण असाच संक्रांतीनिमित्त हळदी-कुंकवाचा कार्यकम्र होता, कट्ट्यावरील नेहमीच्या महिला तर होत्याच, पण त्यांनी परिसरातील इतरही महिलांना बोलावले होते. आपल्या आजूबाजूला काही घटक प्राथमिक प्रतिकूल परिस्थितीत जगत असताना आपण मात्र त्या गावचेच नाही, असं वागणं स्वच्छंदी कट्ट्याच्या महिलांना खटकत होते. सामाजिक आत्मभान जपत स्वछंदी कट्ट्याच्या महिलांनी परिसरातील महिलांना हळदी-कुंकवाला बोलाविले, एकमेकीला तिळगूळ दिला. भेट म्हणून एक एक छोटेसे फुल दिले. संक्रांतीच्या वाणाचे पैसे एकत्र करून ते जुन्नरमधील मावळ भागातील प्राथमिक शाळेतील गरीब मुलांना वही व पेन्सिलसाठी द्यायचे असे एकमताने ठरले.

Web Title: Haldi-Kukku of 'Swadanchi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.