हळदीकुंकू समारंभ व वृक्षलागवडीचे काळूस गावात आयोजन.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:13 AM2021-02-09T04:13:42+5:302021-02-09T04:13:42+5:30

२०० महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष संगीता नाईकरे, नलिनीताई चव्हाण यांच्या उपस्थितीत ...

Haldikunku ceremony and tree planting organized in Kalus village. | हळदीकुंकू समारंभ व वृक्षलागवडीचे काळूस गावात आयोजन.

हळदीकुंकू समारंभ व वृक्षलागवडीचे काळूस गावात आयोजन.

Next

२०० महिलांनी यामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन मानव अधिकार संघटनेचे अध्यक्ष संगीता नाईकरे, नलिनीताई चव्हाण यांच्या उपस्थितीत झाले.

जिजामाता ग्रामसंघाच्या अध्यक्षा व ग्रामपंचायत सदस्या धनश्री गणेश पवळे, आश्विनी अनिल आरगडे, वृषाली बाबाजी खैरे, नम्रता पवन जाचक,राधाबाई पाटीलबुवा आरगडे, खजिनदार निर्मला साळूंके ,लेखापाल पूजा आरगडे,वैशाली खैरे, ऐश्वर्या राऊत, प्रतिक्षा रोकडे आदी महिला उपस्थित होत्या.पंचायत समितीचे सीसी आम्रपल्ली मॅडम व भालेराव मॅडम यांनी बचत गट कशा प्रकारे चालवावे व योजना कशी राबवावी या संदर्भात मार्गदर्शन केले.

या वेळी अनेक फळझाडांची देखील लागवड केल्याने इतर महिला बचत गटांनी आयोजन करावे, असा आशावाद मंजूषा पवळे यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन संतोष फडके यांनी केले.

जिजामाता ग्रामसंघ आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाच्या वेळी वृक्षारोपण करताना महिला भगिनी.

Web Title: Haldikunku ceremony and tree planting organized in Kalus village.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.