अर्धा एकर ज्वारी राखली पक्ष्यांसाठी
By admin | Published: May 12, 2017 04:56 AM2017-05-12T04:56:18+5:302017-05-12T04:56:18+5:30
तीव्र उष्णतेमुळे मनुष्याला नकोशे होत आहे तर प्राणीपक्ष्यांचे काय, यासाठी उपाय म्हणून स्वत:च्या शेतातील काबाडकष्ट करून आलेले
संदीप धुमाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वरवंड : तीव्र उष्णतेमुळे मनुष्याला नकोशे होत आहे तर प्राणीपक्ष्यांचे काय, यासाठी उपाय म्हणून स्वत:च्या शेतातील काबाडकष्ट करून आलेले पीक कडेठाण येथील शेतकऱ्याने पक्ष्यांसाठी अर्धा एकर ज्वारी दिली.
सध्या शेतकऱ्यांचा मालाचा बाजारभावाबाबत प्रश्न, विजेचा प्रश्न, शेतमालाचे उत्पादन होईल का यांची चिंंता, दुष्काळ, रोग, अवकाळी अशा विविध प्रश्नांनी वेढलेला आहे. उत्पादनाची पर्वा न करता नुकसान होईल यांची काळजी नकरता कडेठाण येथील लक्ष्मण कुंजीर यां शेतकऱ्यांने चक्क अर्धा एकर ज्वारी पक्ष्यांसाठी राखून ठेवली आहे ही ज्वारी न काढता तशीच शेतात उभी आहे. या लखलखत्या उन्हामध्ये माणसाला नकोसे झाले आहे. यामुळे या शेतकऱ्याने पक्ष्यांसाठी शेतामध्ये पिण्यासाठी कापून ठेवलेले पाण्याचे ड्रम ठिकठिकाणी ठेवले आहे. यामुळे या पक्षांची अन्नसाठी व पाणीसाठीची वणवण थांबणार आहे.
शेतकरी लक्ष्मण कुंजीर या वेळी म्हणाले, की या उष्णतेचे प्रमाण तीव्र असून माणसाला या उष्णतेने असहाय झाले आहे, तर या पक्ष्यांचे काय, असा क्षणभर विचार आला यामुळे आम्ही हा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक जण स्वत:चा विचार करत आहे. कोणीही या प्राण्यांचा व पक्ष्यांचा विचार करत नाही. मात्र सर्वांनी थोडा का होईना त्यांचा विचार केला पाहीजे. यावेळी लक्ष्मण कुंजीर, संजय रणधीर,
अजित दिवेकर, हृषीकेश कुंजीर उपस्थित होते.