दौंडमध्ये पोलीसबळ निम्मेच, ग्रामसुरक्षा दल नव्याने निर्माण करण्यासाठी बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 02:26 AM2018-01-04T02:26:45+5:302018-01-04T02:26:58+5:30
दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस कर्मचारीसंख्या पाहिजे त्यापेक्षा निम्म्याने कमी असल्याने दौंड शहर व ग्रामीण भागातील जवळपास ३५ गावांची सुरक्षाव्यवस्था लक्षात घेता व जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या घटनेने पोलीस दल चांगलेच धास्तावले आहे.
कुरकुंभ - दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत पोलीस कर्मचारीसंख्या पाहिजे त्यापेक्षा निम्म्याने कमी असल्याने दौंड शहर व ग्रामीण भागातील जवळपास ३५ गावांची सुरक्षाव्यवस्था लक्षात घेता व जिल्ह्यातील वाढत्या गुन्ह्यांच्या घटनेने पोलीस दल चांगलेच धास्तावले आहे.
त्यामुळे ग्रामसुरक्षा दलाची पुनर्बांधणी करण्यासाठी दौंडचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर व उपविभागीय अधिकारी बारामती विभाग गणेश मोरे, उपनिरीक्षक भानुदास जाधव, सरपंच जयश्री भागवत, उपसरपंच रशीद मुलाणी, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत कुरकुंभ ग्रामपंचायत कार्यालयात बैठक पार पडली. तीमध्ये दौंड तालुक्यातील वाढत्या घरफोड्या, चोºया, दरोडा, जबरी लूटमार तसेच महामार्गावरील लूटमार रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या सोबत चर्चासत्र आयोजित केले होते. यामध्ये तरुणांना पोलीस प्रशासनाला मदत करण्याचे आवाहन करण्यात आले.
दौंड तालुक्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्याच्या विविध ठिकाणी झालेल्या घटना व त्यामधून निर्माण झालेली तेढ पाहता, याची बांधणी करणे किती आवश्यक आहे, याचे उदाहरण या वेळी देण्यात आले.
सध्या दौंड पोलीस ठाण्यात पोलीस संख्याबळ अतिशय कमी आहे. त्यामुळे विविध तपासाची गती किंवा अन्य कामासाठी पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातूनच जर एखादी चोरी किंवा अन्य घटना घडली, तर त्या कामासाठी कसाबसा वेळ पोलिसांना मिळणे कठीण झाले आहे.
दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत सध्या जवळपास ३५ गावे येत आहेत. त्यात दौंड शहराचादेखील समावेश आहे. त्यामुळे गुन्ह्यांचा तपास, कोर्ट ड्युटी, ग्रामीण भागातील गावांना, महामार्गावर व्यवस्था तसेच दौंड येथील पोलीस ठाण्यात असणारे पोलीस बळ वगळता अगदी थोड्या कर्मचारीवर्गावर मोठा ताण पडत असल्याने कामाला विलंब होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यातही सध्या विविध गुन्हेगारांवर मोक्का व तडीपारीसारखे गुन्हे दाखल करून त्यांच्या कारवाया रोखण्याचा प्रयास होत आहे.
एखाद्या गावात कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी ग्रामसुरक्षा दलाची अत्यंत गरज आहे.
दौंड तालुक्याचा सीमारेषा नगर जिल्ह्याच्या अतिशय जवळ असल्याने सीमारेषेवर जास्त लक्ष केंद्रित करून येणाºया संकटांना थोपविण्याचा प्रयत्न सध्या पोलीस जरी करीत असले, तरी तालुक्याच्या
अंतर्गत सुरक्षेला केव्हा धोका निर्माण होईल, हे सांगणे कठीण होऊन बसले आहे.
शेजारील तालुक्यात घडलेल्या जबरी चोºया, दरोड्यातून झालेली मारहाण व त्यात काही जणांना गमवावा लागलेला जीव, हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता आधीच सतर्क राहणे उपयुक्त ठरू शकते.
त्यामुळे गावपातळीवर अत्यंत उत्तम प्रकारे कार्य करणाºया ग्रामसुरक्षा दलाची बांधणी करणे गरजेचे असल्याचे जाणकार सांगतात.
ग्रामसुरक्षा दलातील तरुणांना बॅच देण्यात येणार असून, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून काठी, शिटी, बॅटरी देण्यात येणार आहे. तरुणांना याबाबत सर्व माहिती दिली जाणार असून, त्यामुळे आपला गाव व साहजिकच समाज सुरक्षित राहण्यास मदत होईल व औद्योगिक क्षेत्रात घडणाºया बेकायदेशीर प्रकारांवरदेखील लक्ष केंद्रित करता येणे शक्य आहे. इतर शासकीय कार्यक्रमांतदेखील या दलाचा उपयोग करता येणे शक्य असल्याचे उपविभागीय अधिकारी गणेश मोरे यांनी सांगितले.
फटका पोलिसांना
दौंड तालुक्यातील पोलिसांच्या संख्याबळाचा प्रश्न तसा खूप जुना आहे. वाढती लोकसंख्या, कुरकुंभ औद्योगिक क्षेत्र, भीमा नदीपात्रातील वाळूतस्करी, मटका, जुगार, वेश्याव्यवसाय, अवैध दारू विकणे अशा विविध घटना व राजकीय तणाव यासारख्या असंख्य घटना दौंड परिसरात होताना दिसत आहे. शासनानेदेखील पुरेसे संख्याबळ देणे आवश्यक आहे. तर, यामध्ये तालुकास्तरीय नेतृत्वानेदेखील दखल घेऊन काम करणे आवश्यक आहे. कमी संख्याबळाचा फटका ग्रामीण भागातील पोलिसांना बसत आहे. एकाच वेळी चार-पाच गावांची कामे पाहण्यात त्यांचीदेखील दमछाक होत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी म्हणून तरुणांनी ग्रामसुरक्षा दलाकडे बघणे आवश्यक आहे.
ग्रामसुरक्षा दलात सामील होण्यासाठी सर्वच तरुणांना आवाहन करण्यात आले आहे. सध्या चोºया करताना मोठ्या प्रमाणात माणसे मारण्याच्या घटना घडत आहेत. यासाठी कोयता, चाकू व अन्य धारदार शस्त्रांचा वापर करण्यात येतो. गावातील वाड्यावस्त्या तसेच अगदी रस्त्याच्या कडेला असलेली घरे व बंद असणाºया घरांचा यामध्ये समावेश आहे. सर्व गावांना शक्य होईल तितके सीसीटीव्ही लावण्याचेदेखील आवाहन करीत आहोत. तरुणांच्या सहकार्याने ग्रामीण भागात पोलिसांच्या मदतीला एका सक्षम ग्रामसुरक्षा दलाची निर्मिती नक्की होईल.
- भगवान निंबाळकर, पोलीस निरीक्षक दौंड