आधी पुनर्वसन, मगच धरण!
By admin | Published: December 9, 2014 11:27 PM2014-12-09T23:27:22+5:302014-12-09T23:27:22+5:30
बोपगाव (ता. पुरंदर) येथील अनेक वर्षापासून रखडलेल्या रायता धरण प्रकल्पाकडे आता शासकीय अधिका:यांचे लक्ष पुन्हा एकदा वळले
Next
नारायणपूर : बोपगाव (ता. पुरंदर) येथील अनेक वर्षापासून रखडलेल्या रायता धरण प्रकल्पाकडे आता शासकीय अधिका:यांचे लक्ष पुन्हा एकदा वळले असून जलसंपदा खात्याच्या कार्यकारी अभियंतांच्या भेटीदरम्यान आधी पुनर्वसन मग धरण असा पवित्र आज शेतक:यांनी घेतला आह़े
भारतीय जनता पक्षाच्या सरकारामध्ये शिवसेना सहभागी होऊन यांचे युतीचे सरकार सत्तेवर आल़े त्यात पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचा मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश झाला आह़े त्यांच्याकडे जलसंपदा आणि जलसंधारण खाते देण्यात आले आह़े यामुळे आता पुरंदर तालुक्यातील विस्मृस्तीत गेलेल्या रायता धरणाविषयी पुन्हा हालचाली 42 वर्षानंतर सुरु झाल्या आहेत़
जलसंपदा खात्याचे कार्यकारी अभियंता अतुल कपोले यांनी आज या प्रकल्पाची पाहणी केली. या वेळी बोपगाव येथील शेतक:यांना त्यांच्यापुढे आपल्या मागण्या मांडल्या़
आधी धरणग्रस्तांचे पुनर्वसन
करा, जमिनीच्या बदल्यात जमिनी द्या, ज्या ठिकाणाहून कालवे जाणार असतील त्या कालव्याखालील जमिनी द्या, जर आमच्या मागण्या पूर्ण होणार नसतील तर धरण रद्द करून जमिनीवरील सीलिंग उठवावे. आणि या परिसरात साखळी बंधारे करावेत, अशा मागण्या या वेळी शेतक:यांनी केल्या.
या धरणासंदर्भात शेतकरी उच्च न्यायालयात गेले असून, सध्या न्यायालयाने स्थगिती दिली आहे. जोर्पयत सर्व शेतक:यांचे पुनर्वसन होत नाही, तोर्पयत धरणाच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे.
याबाबत अभियंता कपोले यांनी सांगितले, की आम्ही आज या धरणाची परिस्थिती पहिली आहे. शेतक:यांच्या काय भावना आहेत,
त्या जाणून घेतल्या आहेत. जे धरणग्रस्त आहेत, त्यांनी आपल्या मागण्या लेखी स्वरूपात द्याव्यात. यातून मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावण्यात येईल. यासाठी शेतक:यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
बोपगाव (ता. पुरंदर) येथील रयत धरणावर या वेळी कपोले यांच्यासमवेत उपकार्यकारी अभियंता एम. आर. ननवरे, नीलेश मोढवे, सरपंच खंडूनाना फडतरे, माजी सरपंच योगेश फडतरे, कानिफनाथ फडतरे, शहाजी फडतरे, संदीप फडतरे, सुभाष फडतरे, रामदास फडतरे, शांताराम जगदाळे, प्रमोदअप्पा फडतरे, पांडुरंग फडतरे, बाबूराव फडतरे, साहेबराव जगदाळे, रवींद्र फडतरे, संतोष जगदाळे, मोतीराम कटके आदी ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. (वार्ताहर)
4पुरंदरच्या पश्चिम परिसराला वरदान ठरणारे हे बहुचर्चित रायता धरण अनेक वर्षापासून रखडलेले आहे. तत्कालीन आमदार बापू खैरे यांनी या धरणासाठी प्रयत्न केले होत़े त्यावेळी या प्रकल्पाला खूप मोठा विरोध झाला. या धरणाचे जवळपास 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यानंतर अनेक वर्षे याच धरणाच्या मुद्दय़ावर निवडणुका गाजल्या. या धरणाच्या परिसरातील बोपगाव, चांबळी, हिवरे, भिवरी या गावांमधील जमिनी ओलिताखाली येणार आहेत.
4शेकडो हेक्टर क्षेत्न बागायती होणार आहे. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी चांबळी येथील सरकारी गायरान देण्यास गावकरी तयार आहेत. तसा ग्रामपंचायतीने ठरावही केला आहे.
4धरणाचे काम साधारण 197क् च्या सुमारास चालू झाले आणि अर्धा टीएमसी पाणी साठा होणा:या या धरणाचे काम 1972 च्या सुमारास बंद पडले.
4या धरणात खाली 256 हेक्टर क्षेत्न ओलिताखाली येत आहे, तर भिवरी आणि बोपगाव या गावांतील बुडिताखाली 47 हेक्टर क्षेत्न येते. एकूण जमीन 265 हेक्टर लाभक्षेत्नात आहे.
या परिसरातील धरणग्रस्तांच्या मागण्या रास्त आहेत. आधी पुनर्वसन झालेच पाहिजे. धरण झाले तर या भागातील सीलिंगचा मोठा प्रश्न सुटेल. तसेच पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याचाही प्रश्न काहीसा सुटण्यास मदत होईल.
- एम. के. गायकवाड, हिवरे गावचे
माजी सरपंच (लाभार्थी)