बारावीचे १६ हजार परीक्षार्थी
By admin | Published: February 21, 2015 02:08 AM2015-02-21T02:08:15+5:302015-02-21T02:08:15+5:30
बारावीच्या परीक्षेला शनिवारपासून (दि. २१) सुरू होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील १३ केंद्रांवरून सुमारे १६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
पिंपरी : बारावीच्या परीक्षेला शनिवारपासून (दि. २१) सुरू होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील १३ केंद्रांवरून सुमारे १६ हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. महाविद्यालयामध्येही विद्यार्थ्यांची आसन व्यवस्था पूर्ण झाली आहे. परीक्षेत गैरमार्गाचा वापर होणार नाही, याचीही दक्षता परीक्षा विभागाच्या वतीने घेतली जात आहे.
शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, विद्यार्थ्यांना वेळेपूर्वी १० मिनिटे पेपर दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर वेळेत हजर राहणे गरजेचे आहे.
परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका वेळेत पोहोचवण्यासाठीचीही व्यवस्था परीक्षा विभागाने पूर्ण केली आहे. परीक्षेविषयीच्या सूचना ही
प्रत्येक परीक्षा केंद्रावर शुक्रवारीच दिल्या आहेत. परीक्षा केंद्रामध्ये विद्यार्थ्यांचे नंबर टाकण्याचे कामही झाले आहे.
शाळेच्या वेळापत्रकात बदल
बारावीचा पेपर असल्यामुळे ज्या महाविद्यालयांत परीक्षा केंद्र आहे, तेथील शाळेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत तासिका होणार आहेत. तर ज्या ठिकाणी शाळा दुपारच्या होत्या, त्या ठिकाणी त्या २ ते ५मध्ये भरविण्यात येणार आहेत.
एखादा विद्यार्थी परीक्षा केंद्रावर जाताना धावपळ होऊ नये, कारण अपघात होण्याची शक्यता
आहे. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये, यासाठी
परीक्षा विभागाने त्याच्या जवळच्या केंद्रावर परीक्षा देण्याची सोय
उपलब्ध आहे. (प्रतिनिधी)
कॉफी रोखण्यासाठी तीन भरारी पथके असणार आहेत. विद्यार्थ्यांना मुक्त वातावरणात पेपर देता यावा, कुठेही गैरमार्गाचा वापर होणार नाही, याची खबरदारी पथकांच्या वतीने घेतली जाणार आहे.
- पराग मुंडे, सहायक प्रशासन अधिकारी
कॉफीमुक्त अभियान
४शिक्षण विभागाच्या वतीने कॉफीमुक्त अभियान राबवण्यासाठी गैरमार्ग रोखण्यासाठी कॉफीमुक्त अभियान राबवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विद्यालयाला सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यालयांनाही कॉफी रोखण्याच्या सूचना केल्या आहेत.