जनाई-शिरसाई योजनेच्या कार्यालयात तळीरामांचा हैदोस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2019 01:36 AM2019-03-19T01:36:36+5:302019-03-19T01:36:57+5:30
दौैंड येथील जनाई-शिरसाई योजनेच्या कार्यालयाच्या परिसरातील एका खोलीच्या दरवाजाला मद्यपींनी लाथा मारून दरवाजा उघडून हैदोस घातला. त्यामुळे शासकीय खोलीतील कागदपत्रांची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
दौैंड - दौैंड येथील जनाई-शिरसाई योजनेच्या कार्यालयाच्या परिसरातील एका खोलीच्या दरवाजाला मद्यपींनी लाथा मारून दरवाजा उघडून हैदोस घातला. त्यामुळे शासकीय खोलीतील कागदपत्रांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. शिवाय त्या मद्यपींवर दिवसभरात कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
ही घटना रात्री १२ च्या सुमारास ही घडली. संबंधित कार्यालयाच्या पहारेकऱ्याला रात्री ड्युटी नेमून दिलेली आहे. परिणामी पहारेकरीच नसल्यामुळे सर्रासपणे तळीरामांचा धुमाकूळ सुरू असतो.
येथील प्रशासकीय इमारतीच्या समोर लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय होते. ते कार्यालय पुणे येथे स्थलांतरित झाले असल्याचे समजते. सध्याच्या परिस्थितीत या कार्यालयातून जनाई-शिरसाई योजनेचे काम चालते.
या कार्यालयाला लागून दोन खोल्या आहेत. या दोन्ही खोल्यांमध्ये लघु पाटबंधारे विभागाची महत्त्वाची कागदपत्रे ठेवलेली आहेत.
परंतु या दोन्ही खोल्यांचे दरवाजे कमकुवत आहेत. तसेच या कार्यालयाच्या व्हरांड्यामध्ये सायंकाळी तळीरामांचा अड्डा भरतो.
कार्यालयाच्या समोर मोठे मैैदान असल्यामुळे तळीराम दारू पिऊन बाटल्या मैैदानात फेकतात.
त्यामुळे सकाळी मैैदानावर बाटल्या आणि बाटल्यांच्या काचांचा
खच असतो. याचा परिणाम
पहाटे मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिकांना सोसावा लागतो. त्यामूळे तळीरामांवर कारवाईची मागणी
वाढत आहे.
लघु पाटबंधारे विभागाचे कागदपत्र ज्या खोल्यांमध्ये ठेवलेली
आहेत, त्या खोल्यांच्या खिडक्या सर्रासपणे उघड्या असतात. तर दरवाजेही कमकुवत आहेत. तेव्हा नशेत सिगारेट ओढताना काडी खिडकीतून आत टाकल्यास सर्व कागदपत्रे जळून जाऊ शकतात,
याचा शासनाने विचार करून या कार्यालयाच्या परिसरात
नित्यनियमाने पहारेकरी कार्यरत ठेवावा. वास्तविक पाहता पहारेकºयाची ड्युटी असताना हा पहारेकरी रात्रीच्या वेळेला नेमका कुठे गायब असतो, हा मात्र संशोधनाचा विषय आहे.
अतिप्रसंग टळला
गेल्या वर्षी या कार्यालयाच्या परिसरात सायंकाळी १४ फेब्रुवारी २0१८ रोजी काही तळीराम दारू पित बसले होते. दारूच्या नशेत अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी एका तरुणीचा हात धरून तिचा विनयभंग केला. तिने आरडाओरडा केल्यावर परिसरातील एका कन्स्ट्रक्शनच्या कामावर असलेला पहारेकरी धावून आला अणि पुढील अतिप्रसंग टळला होता.
जनाई-शिरसाई योजनेच्या परिसरात असलेल्या खोल्यांमध्ये लघु पाटबंधारे विभागाची कागदपत्रे आहेत. मात्र महत्त्वाची कागदपत्रे हलविण्यात आलेली आहेत. जी कागदपत्रे शिल्लक आहेत तीदेखील हलविणार आहे. तसेच पहारेकरी नित्यनियमाने या ठिकाणी कामकाज करीत असतो. कागदपत्रांच्या खोलीचे दरवाजे व्यवस्थित बसविण्याच्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे.
- तेजस्विनी राऊत
अभियंता, जनाई-शिरसाई योजना