चाकणला अतिक्रमणांवर हातोडा; सततच्या वाहतूककोंडीने नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:14 AM2021-09-09T04:14:23+5:302021-09-09T04:14:23+5:30

चाकण शहरालगतच्या मेदनकरवाडी आणि नाणेकरवाडी हद्दीतील माणिक चौक, तळेगाव चौक, मुटकेवाडी, बालाजीनगर ते जुना पुणे नाशिक रस्त्याच्या दुतर्फा पथारीवाले, ...

Hammer on Chakan encroachments; Citizens harassed by constant traffic congestion | चाकणला अतिक्रमणांवर हातोडा; सततच्या वाहतूककोंडीने नागरिक हैराण

चाकणला अतिक्रमणांवर हातोडा; सततच्या वाहतूककोंडीने नागरिक हैराण

googlenewsNext

चाकण शहरालगतच्या मेदनकरवाडी आणि नाणेकरवाडी हद्दीतील माणिक चौक, तळेगाव चौक, मुटकेवाडी, बालाजीनगर ते जुना पुणे नाशिक रस्त्याच्या दुतर्फा पथारीवाले, हातगाडीवाले व्यवसायिकांनी रस्त्यावर अतिक्रमणे करून दुकाने थाटली होती. यामुळे सतत वाहतूककोंडी होत होती. यामुळे चाकण नगरपरिषद, नाणेकरवाडी ग्रामपंचायत यांनी संयुक्तपणे कारवाई करून वाहतुकीला अडथळा ठरणारी दुकाने हटवल्याने चौकांसह रस्त्याने काही दिवस का होईना मोकळा श्वास घेतला आहे.

चाकण शहरात लगतच्या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रस्त्यावर अतिक्रमण करून पान टपऱ्या, पथारी व्यवसायिक आणि हातगाडीवाल्यांनी ठाण मांडल्याने सतत वाहतूककोंडी होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दुकानांच्यासमोर अस्ताव्यस्तपणे सुरू असलेल्या अशा व्यवसायिकांमुळे सगळीकडे बकालीकरण वाढत आहे. एसटी बसस्थानिकाला तर बेकायदेशीर व्यावसायिकांचा अक्षरशः वेढा पडला आहे. यामुळे अनेक एसटी बसस्थानकात न येताच महामार्गावरून परस्पर जात आहे.

तळेगाव चौक ते माणिक चौक दरम्यान ही एसटी बसस्थानकासमोर रस्त्याच्या दुतर्फा अगदी महामार्गाला खेटूनच अशा व्यवसायिकांनी अतिक्रमण केल्याने पादचाऱ्यांना चालायलासुद्धा जागा मिळत नाही. औद्योगिक वसाहतीमुळे मोठ्या संख्येने अवजड वाहनांचा राबता मार्गांवर असल्याने अनेकदा जीवघेणे अपघात घडले आहेत. अशी कारवाई पुढील पंधरा दिवस सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांच्या मागणीचा विचार करून ही अतिक्रमणे संयुक्त कारवाई करून हटवण्यात आली आहेत.

फोटो - चाकण येथील माणिक चौकात अतिक्रमण हटवताना.

080921\screenshot_20210908-153951_video player.jpg

???? - ???? ????? ????? ????? ???????? ???????.

Web Title: Hammer on Chakan encroachments; Citizens harassed by constant traffic congestion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.