कुदळवाडीत अतिक्रमणावर हातोडा
By admin | Published: December 5, 2014 05:10 AM2014-12-05T05:10:44+5:302014-12-05T05:10:44+5:30
काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी बीआरटीएस मार्गावरील अतिक्रमणांवर महापालिकेने नांगर फिरविला. दोन इमारती व पत्राशेडचा त्यात समावेश होता
पिंपरी : काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी बीआरटीएस मार्गावरील अतिक्रमणांवर महापालिकेने नांगर फिरविला. दोन इमारती व पत्राशेडचा त्यात समावेश होता.
पिंपरी-चिंचवड महापालिका शहरात बीआरटीएस प्रकल्प राबवत आहे. त्याअंतर्गत काळेवाडी फाटा ते देहु-आळंदी रस्ता बीआरटीएस मार्ग सुरु करण्यात येणार आहे. त्याचे कामही प्रगतीपथावर आहे. मात्र, मार्गावर कुदळवाडी येथे अतिक्र मण करु न पक्के बांधकाम व पत्राशेड उभारण्यात आले होते. हे
अतिक्र मण कामात अडसर ठरत होते. सुमारे ५० हजार चौरस फुट जागेत हे बांधकाम होते. अतिक्र मण निर्मूलन कारवाई सहशहर अभियंता राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता अनिल राऊत, प्रमोद ओभांसे, उपअभियंता आर. डी. सुर्यवंशी, कनिष्ठ अभियंता तसेच नगररचना विभागाचे कनिष्ठ अभियंता सुनील शिंदे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)