देहूत अतिक्रमणांवर हातोडा!
By admin | Published: June 15, 2014 04:20 AM2014-06-15T04:20:31+5:302014-06-15T04:20:31+5:30
पालखी मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढावीत, वेळ पडल्यास त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांनी दिल्या होत्या
देहूगाव : येथील पालखी मार्गावरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीच्या वतीने हटविण्यात आल्याने येथील पालखी मार्गाने व महाद्वार कमानीने मोकळा श्वास घेतला. ग्रामपंचायतीच्या वतीने एक पोलीस कर्मचारी, जेसीपी, ट्रॅक्टर, ग्रामपंचायतीचे १० कामगार यांच्या मदतीने ही कारवाई सायंकाळपर्यंत करण्यात आल्याची माहिती ग्रामसेवक अर्जुन गुडसुरकर यांनी दिली.
शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास महाद्वार कमानीपासून कारवाईला सुरवात झाली. येथील टपऱ्या, ज्यूसबार, हातगाड्या अशी सुमारे ४० अतिक्रमणे हटविण्यात आली. २८ बांधकामांवरील साहित्य व इतर रस्त्यावरील टाकण्यात आलेले किरकोळ साहित्य काढण्यात आले.
पालखी मार्गावरील रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे काढावीत, वेळ पडल्यास त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी, अशा सूचना प्रांताधिकारी स्नेहल बर्गे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार तीन नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर शनिवारी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली. (वार्ताहर)