पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल वैशालीच्या अनाधिकृत बांधकामावर हातोडा
By राजू हिंगे | Published: September 20, 2023 07:09 PM2023-09-20T19:09:43+5:302023-09-20T19:10:04+5:30
सुमारे ३ हजार ५०० चौरस फुट अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आले
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली आणि क्वीन्स शॉप स्टोरी येथील अनाधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. त्यात सुमारे ३ हजार ५०० चौरस फुट अनाधिकृत बांधकाम पाडण्यात आले. या मध्ये बांबू, पत्रा , लोखंडी ॲगल , ओनिग ई चे सहाय्याने बांधलेल्या शेडचा समावेश आहे. वैशाली हॉटेल मधील टेरेस आणि सामासिक अंतरातील सर्व विनापरवाना शेड काढण्यात आल्या. यावेळी हलवता येणारे ओनिंग शेडही गॅस कटर ने कापून काढण्यात आले.
कार्यकारी अभियंता बिपिन शिंदे, यांचे मार्गदर्शन खाली उप अभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे, कनिष्ठ अभियंता समिर गढई यांनी, एक गॅस कटर घरपाडी विभागाकडील १० बिगारी, एक पोलिस गट ई च्या सहाय्याने कारवाई पूर्ण केली.
अनाधिकृत बांधकाम पुन्हा केल्यास गुन्हा दाखल करणार
शिवाजीनगर भागातील अनाधिकृत बांधकामावर यापुढेही कारवाई सुरू राहणार आहे. ज्या हॉटेलवर पालिकेने कारवाई केली त्यांनी पुन्हा अनाधिकृत शेड उभारली तर गुन्हा दाखल करण्यात येईल असे पालिकेच उपअभियंता सुनिल कदम यांनी सांगितले.