कोंढव्यात अनधिकृत बांधकामावर हातोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:21+5:302021-01-20T04:12:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पालिकेच्या बांधकाम विभागाकडून कोंढव्यातील अनधिकृत बांधकांवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्यासाठी इमारत निरीक्षक व ...

Hammer on unauthorized construction in Kondhwa | कोंढव्यात अनधिकृत बांधकामावर हातोडा

कोंढव्यात अनधिकृत बांधकामावर हातोडा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पालिकेच्या बांधकाम विभागाकडून कोंढव्यातील अनधिकृत बांधकांवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्यासाठी इमारत निरीक्षक व उपअभियंता तसेच २५ कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. या पथकाने मंगळवारी कोंढव्यात कारवाई करीत अनधिकृत बांधकाम हटविले.

पालिकेने बेकायदा बांधकाम प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. उजेर सय्यद, सरफराज खान, दादा गायकवाड, एफ. एफ. पठाण यांच्या मिळकतींवर पालिकेने कोंढवा पोलिसांच्या मदतीने कारवाई केली. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी पालिका प्रशासनाला मोठी मदत केली.

यासोबतच धनकवडी येथील विनापरवाना बांधकामावर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम १९६६ कलम ५३ (१) (ए) अन्वये नोटीस देऊन कारवाई करणेत आली. या कारवाईमध्ये स. नं. ३७ येथील संजय माने यांचे २० चौरस फूट, स. नं. ३० येथील मंदाकिनी अगवणे यांचे ३०० चौरस फूट, अमित काजगर यांचे ३० चौरस फूट असे एकूण ३५० चौरस फूट क्षेत्र मोकळे करण्यात आले. ही कारवाई १ गॅस कटर, ३ ब्रेकर, बिगारी व पोलिसांच्या साहाय्याने पूर्ण करण्यात आली.

Web Title: Hammer on unauthorized construction in Kondhwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.