शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाड़ीवार सिलेंडरचा स्फोट
By नम्रता फडणीस | Updated: December 12, 2024 21:02 IST2024-12-12T21:01:06+5:302024-12-12T21:02:36+5:30
यात तिघे किरकोळ भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी ( दि. १२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाड़ीवार सिलेंडरचा स्फोट
पुणे :शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर तीन च्या समोरील खाद्यपदार्थाच्या हातगाडीवर लायटर गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला. यात तिघे किरकोळ भाजल्याने जखमी झाले. ही घटना गुरुवारी ( दि. १२) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
कामगार गोविंदा अंकुशे (वय ४२ , संतोष सोनवणे (वय ३७) आणि पोलिस नाईक निलेश सुभाष दरेकर अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर औंध येथील एम्स हॉस्पिटल येथे उपचार सुरु असून, सर्वांची प्रकृती ठीक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. १२) शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट नंबर तीनच्या समोरील वडापावची गाड़ी आहे.
पारी अडीचच्या सुमारास चहा पिण्यासाठी एका हातगाडी जवळ पोलिस नाईक गेले होते. त्यावेळी अचानक गाडीवर लायटर मध्ये गॅस भरण्याच्या बाटलीचा स्फोट झाला यामध्ये दरेकर यांचे दोन्ही हात आणि चेहऱ्याला भाजले आहे. कामगार देखील जखमी झाले आहेत. पोलिस पुढील कारवाई करीत आहेत.