हाताबाहेर चाललाय डेंगी
By admin | Published: October 30, 2014 12:02 AM2014-10-30T00:02:11+5:302014-10-30T00:02:11+5:30
चार महिन्यांपासून शहरात सुरू असलेली डेंगीची साथ महापालिकेच्या हाताबाहेर असल्याचे चित्र असून, शहरातील या आजाराच्या रुग्णांची संख्या चार हजारांच्या घरात पोहोचली आहे.
Next
पुणो : चार महिन्यांपासून शहरात सुरू असलेली डेंगीची साथ महापालिकेच्या हाताबाहेर असल्याचे चित्र असून, शहरातील या आजाराच्या रुग्णांची संख्या चार हजारांच्या घरात पोहोचली आहे. आज दिवसभरात डेंगीचे 27 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. ऑक्टोबर महिन्यातील रुग्णांची संख्या 462वर पोहोचली आहे. गेल्या सहा महिन्यांत या आजाराने शहरात सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
जूनपासून शहरात डेंगीच्या साथीचा उद्रेक झालेला आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून महिनाभरपासून डेंगी हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यात सुमारे दीड हजार कर्मचा:यांच्या माध्यमातून डासोत्पत्तीची ठिकाणो शोधणो , ती नष्ट करणो, घरोघरी जाऊन माहिती पत्रके वाटणो असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत दिवसोंदिवस वाढच होत असल्याचे महापालिकेकडून देण्यात येणा:या माहितीवरून समोर येत आहे. डेंगीवर नियंत्रण आणण्यासाठी पालिकेने सर्वतोपरी प्रयत्न चालविले असले, तरी ते तोकडे पडत असल्याचेच चित्र सध्या तरी दिसत आहे. (प्रतिनिधी)
पालिकेच्या विभागांमध्ये नाही समन्वय
नागरिकांच्या घरांपाठोपाठ शहरातील बांधकामे आणि महापालिकेच्या साचलेल्या भंगार साहित्याच्या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात डासांची पैदास आढळून येत आहे.
महापालिकेच्या जागांमध्ये प्रामुख्याने अतिक्रमण कारवाईत उचलून आणलेल्या भंगाराच्या साहित्यात पावसा़चे पाणी साठल्याने डासांची पैदास झालेली आहे.
त्या ठिकाणी पुन:पुन्हा पावसाने पाणी साठत असल्याने पालिका वारंवार त्या ठिकाणी औषधफवारणी करीत आहे. मात्र, हे साहित्य भंगारात काढण्याचे अथवा नष्ट करण्याचे काम अतिक्रमण विभागाकडून होत नाही. त्याचे गंभीर परिणाम मात्र पुणोकरांना भोगावे लागत आहेत.
अतिक्रमण विभागाबरोबरच शहरात सुरू असलेल्या बांधकामांच्या ठिकाणीही मोठय़ा प्रमाणात डेंगी डासोत्पत्तीची ठिकाणो आढळत आहेत. मात्र, या बांधकामांवर कारवाई करण्यास बांधकाम विभागाकडून टाळाटाळ केली जात आहे. तसेच, बांधकामे कच्ची असल्याचे कारण पुढे करून औषधफवारणी करण्यास मनाई केली जात आहे. परिणामी, अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती मोठय़ा प्रमाणात होत आहे.