ज्येष्ठ महिलेच्या तोंडात रुमाल कोंबून १ लाखाच्या सोन्याच्या पाटल्या हिसकावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:09 AM2021-03-19T04:09:39+5:302021-03-19T04:09:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शेठला मुलगा झाल्याने फुकट औषधे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच ज्येष्ठ महिलेला एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शेठला मुलगा झाल्याने फुकट औषधे वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच ज्येष्ठ महिलेला एका बाजूला नेऊन त्यांच्या तोंडात दोन चोरट्यांनी रुमाल कोंबला. त्यावेळी हातातील १ लाखाच्या सोन्याच्या पाटल्या जबरदस्तीने चोरून नेल्या.
याप्रकरणी रास्तेवाडा येथील एका ७० वर्षाच्या ज्येष्ठ महिलेने समर्थ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. बुधवारी दुपारी साडेबारा ते एक वाजण्याच्या दरम्यान रास्ता पेठ, जैन मंदिराच्या गेटजवळ ही घटना घडली.
फिर्यादी या औषध आणण्यासाठी जात होत्या. यावेळी दोघे जण त्यांना भेटले. त्यांनी आमच्या शेठला मुलगा झाला आहे. ते फुकट औषधे वाटत आहे, माझ्याबरोबर चला, असे म्हणून त्यांनी या महिलेला रास्ता पेठेतील मन मंदिर कपड्याचे दुकानासमोर नेले. तेथे त्यांना या दोघांपैकी एकाने पाणी पाजले. त्या दोघांनी पुन्हा त्यांना बरोबर घेऊन रास्ता पेठेतील जैन मंदिराच्या गेटच्या उजव्या बाजूला असलेल्या वडाच्या झाडाखाली ओट्यावर नेऊन बसविले. त्यानंतर त्यांच्यातील एकाने त्यांच्या तोंडात रुमाल कोंबला. दुसऱ्याने त्यांच्या दोन्ही हातातील एक-एक अशा चार तोळ्याच्या १ लाख रुपयांच्या सोन्याच्या पाटल्या जबरदस्तीने काढून घेऊन ते पळून गेले.
------------
अनेक आश्वासने देऊन फसवणूक
पैसे दुप्पट करून देतो, सोन्याचे दागिने वाढवून देतो, एखादी गोष्ट फुकट देतो, अशी कारणे सांगून अनेकांना फसवले जाते. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता सावध राहिले पाहिजे, अन्यथा फसवले जाण्याची शक्यता आहे.