दस्तनोंदणीला कनेक्टिव्हिटीचा अडथळा

By admin | Published: March 28, 2016 03:14 AM2016-03-28T03:14:47+5:302016-03-28T03:14:47+5:30

नागरिकांच्या खास सुविधेसाठी चाकण (ता. खेड) येथे सुरू करण्यात आलेले दस्तनोंदणी रजिस्टर कार्यालय बीएसएनएलच्या कनेक्टिव्हिटीअभावी मागील तीन दिवसांपासून बंद आहे.

Handling of connectivity | दस्तनोंदणीला कनेक्टिव्हिटीचा अडथळा

दस्तनोंदणीला कनेक्टिव्हिटीचा अडथळा

Next

पुणे : नागरिकांच्या खास सुविधेसाठी चाकण (ता. खेड) येथे सुरू करण्यात आलेले दस्तनोंदणी रजिस्टर कार्यालय बीएसएनएलच्या कनेक्टिव्हिटीअभावी मागील तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे ‘कार्यालय उघडे; पण काम बंद’ अशी अवस्था या ठिकाणी पाहावयास मिळत आहे.
नागरिकांना खरेदी-विक्री, साठेखत, वाटपपत्र, गहाणखत, कुलमुखत्यारपत्र असे दस्त रजिस्टर करण्यात अडचण येत आहे. अशी सर्व कामे करण्यासाठी इंटरनेट सुविधा लागत असते. शासनाच्या या कार्यालयात बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी दिली आहे. परंतु ती वारंवार खंडित होत असल्याने नागरिक हैराण होत आहेत. दस्तनोंदणीसाठी सकाळी आल्यानंतर सायंकाळी पाच-सहा वाजेपर्यंत ताटकळत बसण्याची नागरिकांवर वेळ येत आहे. अनेक वेळा तर कनेक्टिव्हिटी येण्यासाठी लाईट गेल्यानंतर जनरेटरमध्ये डिझेल टाकण्यासाठी भोसे येथे जावे लागते. बहुतांश वेळा हे काम ज्याचा दस्तनोंदणी करायचा आहे, त्यालाच करावे लागत आहे. सुट्यांमध्ये कार्यालये सुरू ठेवण्यात आली. परंतु कनेक्टिव्हिटीअभावी कामकाज बंदच होते. (वार्ताहर)

बीएसएनएलची कनेक्टिव्हिटी वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्यामुळे त्यासाठी दिवसभर ताटकळत बसून राहावे लागत आहे. कधी कधी तर दोन-दोन दिवस कनेक्टिव्हिटी मिळत नाही.
त्यामुळे हे सुविधेसाठी चाकणला आलेले रजिस्टर कार्यालय हे असुविधेचे कार्यालय म्हणून पुढे येत असल्याचे पंचायत समिती सदस्य सोमनाथ दौंडकर व भाजपा तालुका उपाध्यक्ष सुनील देवकर यांनी सांगितले.

Web Title: Handling of connectivity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.