पोटासाठी हात नाही पसरणार

By admin | Published: July 23, 2015 04:17 AM2015-07-23T04:17:44+5:302015-07-23T04:17:44+5:30

तृतीयपंथींचे आयुष्य उपेक्षितच... बोचणाऱ्या नजरा आणि हीनतेची वागणूक हेच त्यांचे जीवन... परंतु किती दिवस दुसऱ्यांसमोर हात पसरणार?

The hands do not spread for the stomach | पोटासाठी हात नाही पसरणार

पोटासाठी हात नाही पसरणार

Next

पुणे : तृतीयपंथींचे आयुष्य उपेक्षितच... बोचणाऱ्या नजरा आणि हीनतेची वागणूक हेच त्यांचे जीवन... परंतु किती दिवस दुसऱ्यांसमोर हात पसरणार?... स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी आव्हानात्मक पाऊल उचलले आहे. लावणीच्या कार्यक्रमाद्वारे आपल्यातील कला समाजासमोर सादर करत आता तृतीयपंथीय कष्टाची भाकर मिळवणार आहेत.
या लावणीच्या कार्यक्रमाचा पहिला प्रयोग बुधवारी बालगंधर्व कलादालनात झाला. या वेळी महिलांसारखीच अदाकारी करत तृतीयपंथींनी उत्तमपणे आपली कला सादर केली. तृतीयपंथीय व इतर लावणी रसिकांनीही या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.
तृतीयपंथीयांंना समाजाने अजूनही स्वीकारलेले नाही. अनेकदा कुटुंबातून त्यांना माणूस म्हणूनही स्वीकारले जात नाही. त्यामुळे ठरावीक वयानंतर त्यांना स्वत:ची वाट निवडावी लागते. कुटुंबच नाही तर समाज तरी कसा स्वीकारणार? त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून पैसे मिळवताना चरितार्थाचे कोणतेही ठोस माध्यम त्यांच्याकडे नसते.
यातही पोट भरण्यासाठी अनेकदा हात पसरावे लागतात. त्यातही पुरेसे हाती काही येईल याची शाश्वती नाहीच. त्यामुळे लावणीसारखा आगळावेगळा उपक्रम हे आमच्यासाठी खऱ्या अर्थाने आव्हान असणार आहे. समाजासमोर स्वत:ला सिद्ध करण्यासाठी ही एक संधी असून, आम्ही आमच्या परीने सर्वार्थाने या नवीन उपक्रमाला न्याय देणार असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
समाजाचा तृतीयपंथीयांंकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि आपल्यासाठीही व्यासपीठ उपलब्ध आहे हे दाखवून देण्यासाठी हा वेगळा उपक्रम करण्याचा प्रयत्न आहे. यातील अनेक जण हे उच्चशिक्षित असून, लावणीचा कार्यक्रम हा एकप्रकारे प्रायोगिक कलाविष्कार असणार आहे.
यात गायन, नृत्य यांसारख्या कला आम्ही १० जणी मिळून साजरा करणार आहोत. त्यामुळे आमच्यातील कलेचे खऱ्या अर्थाने दर्शन होईल आणि समाजाचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल अशी आशा आहे, असे या कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कलाकारांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: The hands do not spread for the stomach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.