दिघीतील शिक्षकाने जोपासला आगळावेगळा छंद

By admin | Published: May 4, 2017 02:36 AM2017-05-04T02:36:40+5:302017-05-04T02:36:40+5:30

मनाला भुरळ घालणारी एखादी वस्तू दिसली की मग ती हवीहवीशी वाटते. तिला बघताच मन सुखावून आनंदी होते. मनाला

Handsome verses developed by a Digite teacher | दिघीतील शिक्षकाने जोपासला आगळावेगळा छंद

दिघीतील शिक्षकाने जोपासला आगळावेगळा छंद

Next

दिघी : मनाला भुरळ घालणारी एखादी वस्तू दिसली की मग ती हवीहवीशी वाटते. तिला बघताच मन सुखावून आनंदी होते. मनाला सुखावणारी ही वस्तू दुसऱ्यांच्या मनालाही सहज आनंदाचा गंध देऊन जाते. अशा अनेक वस्तूंचा केलेला संग्रह म्हणजे छंद. जो दोघांनाही निखळ आनंद देतो. मग तो गरीब असो वा गर्भश्रीमंत. या आनंदातूनच अनेक जण दुर्मिळ चलनी नाणी संग्रह करण्याचा आगळावेगळा छंद जोपासतात. असे छंद कुतूहलातून वाढीस लागतात. असाच आनंद देणारा व विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर टाकणारा छंद दिघीतील श्रीकांत राहणे या शिक्षकाने जोपासला आहे.
श्रीकांत यांना बालपणापासूनच पौराणिक वस्तूंची आवड आहे. शालेय शिक्षण घेतानाच त्यांना नाणी संग्रहाचा छंद जडला. तेव्हापासून ते नाण्यांचे संकलन करीत आहेत. इतिहास विषय आवडीचा असल्याने छंद जोपासण्यास मदत झाल्याचे सांगतात. सध्या ते दिघीतील श्रीमती मंजुरीबाई प्राथमिक विद्यालयात शिक्षक असून, शाळांमध्ये नाणी व पौराणिक वस्तूंचे प्रदर्शन भरवतात. यातून मुलांना मोलाची माहिती मिळते. हा दुर्मिळ नाण्यांचा छंद जोपासायला वडील मनोहर राहणे यांच्याकडून प्रेरणा व आर्थिक पाठबळ मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. रहाणे यांनी केलेल्या संग्रहात पाचवा जॉर्ज व्ही यांची पत्नी मेरीची प्रतिमा असलेले दुर्मिळ पदकही आहे. राजे सयाजीराव गायकवाड यांचा नामोल्लेख असलेले नाणे, अर्धा पैसा, एक पैसा, एक क्वार्टर आणा, सरकार सवंत एक पैसा, दहा पैसे, पाच पैसे, वीस पैसे, पंचवीस पैसे, पन्नास पैसे, ढब्बू पैसा, भोकाचा पैसा, तसेच आपल्या रिझर्व्ह बँकेने महापुरुषांच्या स्मरणार्थ काढलेली एक पैशापासून दहा रुपयापर्यंतची नाणीही त्यांनी संकलित केली आहेत. (वार्ताहर)


भारतीय चलनातील विविध नाणी व नोटा संग्रहित केल्या आहेत. भारतीय संस्कृतीचे जतन करण्यासाठी हा छंद या पुढेही जोपासणार आहे. संकलनातून जुन्या चलनांचा अभ्यास करण्याचे उद्दिष्ट आहे.
- श्रीकांत राहणे, शिक्षक, दिघी

४रहाणे यांच्या संग्रहात दुर्मिळ ४०० नाणी आहेत. सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या काळातील नाणी संकलित केली. गावाकडील वाड्यातून, नातेवाईक, व्यावसायिकांकडून त्यांनी काही नाणी खरेदी केली आहेत. तर काही नाणी पुण्यातील जुन्या बाजारातून, अकोला, कोल्हापूर, मुंबई येथून संकलित केली आहेत.

Web Title: Handsome verses developed by a Digite teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.