नराधम आफताबला लवकरात लवकर फाशी द्या; राज्य महिला आयोगाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 03:35 PM2022-11-16T15:35:48+5:302022-11-16T15:37:31+5:30

राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे रुपाली चाकणकर सांगितले

Hang that murderer as soon as possible demanded the State Commission for Women | नराधम आफताबला लवकरात लवकर फाशी द्या; राज्य महिला आयोगाची मागणी

नराधम आफताबला लवकरात लवकर फाशी द्या; राज्य महिला आयोगाची मागणी

Next

पुणे : दिल्लीतील महरौली येथील फ्लॅटमध्ये 28 वर्षीय आफताब पूनावाला याने 18 मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची निर्घृणपणे हत्या केली. या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत.  आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले. या घृणास्पद कृत्यामुळे समाजातील सर्वच स्तरावरून आफताबवर टीका होऊ लागली आहे. राज्य महिला आयोगाकडूनही या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात यावी. तसेच आफताब नराधमाला लवकरत लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केली आहे. तसेच यासाठी राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्रव्यवहार केला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 
 
चाकणकर म्हणाल्या, वसई, महाराष्ट्राची रहिवासी असलेल्या श्रद्धा वालकर या तरुणीची दिल्लीत झालेली निघृण हत्या आणि त्यानंतर तिच्या मृतदेहाची झालेली विटंबना हे सर्वच माणुसकीला काळीमा फासणारे आहे. मिसिंग तक्रारीनंतर याप्रकरणी मुंबई आणि दिल्ली पोलिसांनी तत्पर कारवाई केल्याने या ५ महिन्यापुर्वी झालेल्या गुन्ह्याचा छडा लागला. मात्र आता आव्हान आहे. आरोपीच्या विरोधात ठोस पुरावे आणि सशक्त दोषाआरोपपत्र लवकर दाखल करण्याचे. तसेच या नराधमाला ही लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हायला हवी. या प्रकरणाचा तपास जलद होउन फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालावी यासाठी राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाकडे पत्रव्यवहार केला आहे. यापुढे ही राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा करेल. 

Web Title: Hang that murderer as soon as possible demanded the State Commission for Women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.