झुलत्या दोरावर दिसतोय जगण्याचा संघर्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:17 AM2017-07-21T04:17:53+5:302017-07-21T04:17:53+5:30

पैसा कमाना, मौज मनाना, सारे जहाँ का बोज उठाना, मेहनत मेरा जीवन, मैं कुली नं. वन..मैं कुली नं. १ या गाण्याच्या सुरांनी बारामतीकर थबकले. भिगवण चौकात

Hanging boom, life is a struggle! | झुलत्या दोरावर दिसतोय जगण्याचा संघर्ष!

झुलत्या दोरावर दिसतोय जगण्याचा संघर्ष!

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : पैसा कमाना, मौज मनाना, सारे जहाँ का बोज उठाना, मेहनत मेरा जीवन, मैं कुली नं. वन..मैं कुली नं. १ या गाण्याच्या सुरांनी बारामतीकर थबकले. भिगवण चौकात सायंकाळी ध्वनीक्षेपकावर हे गाणे वाजत होते. झुलत्या दोरावर जगण्याचा संघर्ष सुरू होता.. अवघ्या ४ वर्षांच्या बालिकेच्या कसरती पाहताना भर रहदारीच्या चौकातील वाहतूक रेंगाळली!
अजाणत्या वयातील ४ वर्षांची बालीका ७ फुट उंचीवर बांधलेल्या दोरावर कोणत्याही आधाराशिवाय कसरती करीत होती. यावेळी तिचा खेळ पाहण्यासाठी लावलेले गाणे जणू जगण्याच्या संघर्षाचीच कहाणी सांगत होता. अजाणत्या वयात ही बालीका खरोखर धोकादायक खेळ करुन तिचे आईवडील ,बहिण भावाचे पालनपोषण करीत होती. खरे तर खेळण्या बागडण्याचे, अंगणवाडीत जाण्याचे तिचे वय. मात्र, कुटुंबाचा भार उचलण्यासाठी तिने आतापासुनच जीवघेण्या कसरतींना सुरवात केल्याचे दिसत होते. कोमल कळी मी इवलीशी..आभाळाइतका ़भार वाहते..दोरीवर उभा राहुन पोटासाठी मृत्यु पाहते..या उक्तीप्रमाणे कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी चित्तथरारक कसरती करणे हेच तिचे जीवन बनले आहे.
आजच्या चार वर्षीय बालीकेच्या उंचावर चाललेल्या कसरती पाहुन बारामतीकर हेलावले. या चिमुरडीच्या कसरती पाहुन अनेकजण जागेवरच थबकले. वाहतुक देखील काही काळ रेंगाळली. काहींनी तिचे मोबाईलमधुन व्हीडीओ चित्रीकरण केले,
काहींनी तिचे फोटो काढले. मात्र, या बालीका केवळ कसरती करण्यात हरवुन गेली होती. तर तिचे वडील ती दोरीवर चालताना तिच्या दोरीवरील पावला बरोबर रस्त्यावरील पाऊल पुढे टाकत होते.
तिच्या वडीलांना तिचे कौतुक देखील होते, काळजी देखील होती. खेळ संपल्यावर मिळेल ते पैसे घेउन
हे कुुटंब पुढील खेळ करण्यासाठी निघुन गेले.

हमारी जिंदगी एक सर्कसही तो है!
उत्तर प्रदेशातील जयराम भाई त्यांची पत्नी दुखीन बाई यांची सुरेखाबाई ही चार वषार्ची ती मुलगी आहे. चरीताथार्साठी हे कसरतीचे खेळ ते करतात. एवढ्या सर्कस ही हमारी जिंदगी है, अब क्या करे, असे ते हताशपणे सांगतात. सिर्फ रहनेके के लीए घर है गांव में, खेती और कुछ नाही, इसके सिवा क्या करेंगे अशा शब्दात त्या बालीकेच्या आईने हतबलता व्यक्त केली.

Web Title: Hanging boom, life is a struggle!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.