हनमुंत नाझीरकर यांचा भाचा राहुल खोमणे याचा जामीन अर्ज फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:07 AM2021-07-03T04:07:58+5:302021-07-03T04:07:58+5:30

पुणे : गेल्या १०० हून अधिक दिवस येरवडा कारागृहात असलेल्या निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर याचा भाचा राहुल खोमणे ...

Hanmant Muzirkar's nephew Rahul Khomane's bail application was rejected | हनमुंत नाझीरकर यांचा भाचा राहुल खोमणे याचा जामीन अर्ज फेटाळला

हनमुंत नाझीरकर यांचा भाचा राहुल खोमणे याचा जामीन अर्ज फेटाळला

Next

पुणे : गेल्या १०० हून अधिक दिवस येरवडा कारागृहात असलेल्या निलंबित नगररचना सहसंचालक हनुमंत नाझीरकर याचा भाचा राहुल खोमणे याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळून लावला.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने हनुमंत नाझीरकर याच्यासह ८ जणांविरुद्ध नुकतेच दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यात त्यांनी ८२ कोटी रुपयांची अपसंपदा बाळगल्याचा आरोप आहे. हे दोषारोपपत्र ९१ व्या दिवशी सादर केल्याने आपल्याला जामीन मिळावा, असा अर्ज राहुल खोमणे याच्या वतीने न्यायालयात करण्यात आला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक गिरीश सोनवणे यांनी त्याबाबत न्यायालयात यापूर्वी उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचा उल्लेख नमूद करुन हा जामीन अर्ज फेटाळण्याची विनंती केली. सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी सांगितले की, राहुल शिवाजी खोमणे (वय ३१, रा. शिरवली, ता. बारामती) याला २४ मार्च रोजी अटक करून २५ मार्च रोजी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने प्रथम १ एप्रिल व नंतर ७ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली होती. ७ एप्रिलपासून आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्यावर २४ जून रोजी सकाळी १० वाजून ३५ मिनिटांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. खोमणे हा मार्चचे ७ दिवस, एप्रिलचे २९ दिवस, मे ३१ दिवस व आरोपीने २३ जून रोजी जामिनासाठी (डिफॉल्ट बेल) अर्ज केला आहे. जूनचे २३ दिवस अशी गणना करता आरोपीने ९० दिवस पूर्ण न होताच मुदतपूर्व अर्ज केलेला आहे. यश पाल गुप्ता विरुद्ध पंजाब सरकार व इतर या केसमधील उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे आरोपीवर ९१ व्या दिवशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले आहे. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळावा, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने तो ग्राह्य धरून जामीन अर्ज फेटाळला.

Web Title: Hanmant Muzirkar's nephew Rahul Khomane's bail application was rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.