हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नीचे दागिने परत देण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:08 AM2021-01-10T04:08:25+5:302021-01-10T04:08:25+5:30

पुणे : अमरावती नगर रचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नी संगीता नाझीरकर यांनी त्यांचे दागिने परत करण्यासाठी ...

Hanumant Nazirkar's wife's application for return of jewelery was rejected by the court | हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नीचे दागिने परत देण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नीचे दागिने परत देण्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

googlenewsNext

पुणे : अमरावती नगर रचना विभागाचे सहसंचालक हनुमंत नाझीरकर यांच्या पत्नी संगीता नाझीरकर यांनी त्यांचे दागिने परत करण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. जप्त करण्यात आलेले हे दागिने खरेदी केले किंवा ते स्त्रीधन असल्याचा कोणताही पुरावा त्यांनी सादर न केल्याने हा अर्ज फेटाळत असल्याचे न्यायालयाने आदेशात नमूद केले.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा आदेश दिला. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्या प्रकरणात हनुमंत नाझीरकर (वय ५३) यांच्यासह त्यांच्या पत्नी संगीता नाझीरकर, मुलगा भास्कर नाझीरकर व मुलगी गीतांजली नाझीरकर (रा. स्वप्नशिल्प हौसिंग सोसायटी, कोथरूड) अशा चौघांविरुद्ध अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या घरी घातलेल्या छाप्यात उत्पन्नापेक्षा दोन कोटी 75 लाख रुपयांची जादा रक्कम व मालमत्ता त्यांच्याकडे आढळली. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सीमा मेहेंदळे यांनी फिर्याद दिली आहे. नाझीरकर यांनी केलेल्या अर्जास सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी विरोध केला.

नाझीरकर व त्यांच्या कुटुंबीयांच्या नावे बेहिशेबी मालमत्ता असल्याचे निष्पन्न होत असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाअंती स्पष्ट केले आहे. संगीता नाझीरकर यांच्या वैवाहिक जीवनापूर्वीची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांना वडिलांकडून लग्नाच्या वेळी एवढ्या किंमतीचे व वजनाचे दागिने स्त्रीधन म्हणून दिले हे संशयास्पद असून याबाबत तपास सुरू आहे, असे ॲड. अगरवाल यांनी न्यायालयास सांगितले. दरम्यान, जप्त करण्यात आलेले दागिने हनुमंत नाझीरकर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशातून खरेदी केले आहेत का, याबाबतचा तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेले दागिने संगीता यांना परत केल्यास ते त्याची विक्री करून पुरावा नष्ट करण्याची शक्‍यता असल्याचा युक्तिवाद करण्यात आला.

Web Title: Hanumant Nazirkar's wife's application for return of jewelery was rejected by the court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.