हापस्याचा दांडा मारला...आणि पाणी आलं.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 04:09 AM2021-07-11T04:09:54+5:302021-07-11T04:09:54+5:30

गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण निमित्ताने या वस्तीशी बालरक्षक बाळासाहेब कानडे यांचा सबंध आला.येथील विद्यार्थ्यांना ...

Hapasya's stick hit ... and water came. | हापस्याचा दांडा मारला...आणि पाणी आलं.

हापस्याचा दांडा मारला...आणि पाणी आलं.

googlenewsNext

गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लागला आणि शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण निमित्ताने या वस्तीशी बालरक्षक बाळासाहेब कानडे यांचा सबंध आला.येथील विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केल्याने लोकांशी जवळून संवाद होऊ लागल्याने त्यांनी आपल्या विविध समस्या मांडल्या.पण मर्यादा असल्याने फक्त शिक्षणासबंधित जुजबी समस्या सुटल्या.

यातील पाणीप्रश्न तर कायमचा भेडसावत होता.या नागरिकांच्या 'तृष्णातृप्ती' साठी,स्वच्छतेसाठी अन उत्तम आरोग्यासाठी बोअरवेल (हापसा)निर्माणासाठी काय करता येईल का?यासाठी सामाजिक जाणीवेतून सानेगुरुजी कथामाला व ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानने मदतीचे आवाहन केले असता अडतीस हजार रुपये जमा झाले. बोअरवेल खोदाईसाठी पाण्याची जागा निश्चित करण्यात आली.२४५ फुट खोली पर्यंत खोदाई केली आणि पाणीही लागले.त्यानंतर पंचायत समितीमार्फत हापसा बसविण्यात आला.हापस्याचा दांडा मारला...पाणी आलं..आणि फासेपारधी वस्तीवरील लोकांनी एकच जल्लोष केला.

याकामी गटविकास अधिकारी जालिंदर पठारे,ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठानचे संचालक सम्राट कानडे,भूजल सर्वेक्षक पांडुरंग थोरात,ग्रामविकास अधिकारी के.डी.भोजने,ग्रामपंचायत सदस्य अरुणनाना बाणखेले,लक्ष्मणराव थोरात(भक्ते) यांचे मार्गदर्शन व साने गुरुजी कथामालेचे मार्गदर्शक शामराव कराळे,शिक्षकनेते संजय डुंबरे,चांगदेव पडवळ,बबनराव सानप,संतोष थोरात,फासेपारधी समाजाचे नेते मंगेश भोसले,प्रेम भोसले,रमेश मोरडे आणि सानेगुरुजी कथामाला व ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठान कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

.

आता पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून आमची पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार आहे.

-मंगलबाई काळे (फासेपारधी महिला)

मागील वर्षी येथील शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करताना पालकांनी पिण्याच्या व वापराच्या पाण्याची समस्या मांडली.पाण्यासाठी काहीतरी ठोस कार्यवाही करून पाणीप्रश्न मिटावा यासाठी प्रयत्न सुरु केले.कथामाला व ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी निधी उभारला.पुण्यदायी शास्वत काम घडले.

-मनिषा बाळासाहेब कानडे(अध्यक्ष,ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठान)

मंचर येथील आदिवासी फासेपारधी समाजाचा पाण्याचा प्रश्न सानेगुरुजी कथामाला व ज्ञानलक्ष्मी प्रतिष्ठान यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला.

Web Title: Hapasya's stick hit ... and water came.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.