उठाव नसल्याने हापूस आंब्यांचे दर उतरले, पेटीमागे ३०० ते ५०० रुपयांनी घसरण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 12:37 PM2019-04-17T12:37:02+5:302019-04-17T12:38:39+5:30
पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये सध्या दररोज सुमारे दोन ते अडीच हजार पेट्या रत्नागिरी हापूस आंब्याची आवक होत आहे.
पुणे : कोकणचा राजा देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्यांची गुलटेकडी येथील मार्केट याडार्तील फळबाजारात चांगली आवक सुरु झाली आहे. परंतु निवडणुका व आयपीएल सामन्यामुळे मालाला अपेक्षित उठाव नसल्याने हापूस आंब्यांचे दर पेटीमागे ३०० ते ५०० रुपयांनी उतरले आहेत.
पुण्याच्या मार्केट यार्डमध्ये सध्या दररोज सुमारे दोन ते अडीच हजार पेट्या रत्नागिरी हापूस आंब्याची आवक होत आहे. अद्यापही अपेक्षित आवक वाढली नसली तरी मागणी देखील कमीच आहे. सध्या ४ ते ८ डझन पेटीमागे १५०० ते ३००० हजारांचा दर मिळत आहे. आवक कमी असल्याने दर चांगले मिळण्याची अपेक्षा असते. परंतु राज्यात लोकसभा निवडणुका व आयपीएलचे सामने सुरु आहेत. यामुळे मार्केटमध्ये आंब्याला अपेक्षित उठाव नसल्याचे हापूस आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.
गेल्या आठ-दहा दिवसांपासून रत्नागिरी आंब्याची आवक सुरळीतपणे सुरु आहे. सध्या चांगल्या प्रतीचा आंबा बाजारात उपलब्ध होत आहे. सध्या प्रतवारीनुसार ६०० ते ९०० रुपये डझने दर मिळत आहेत, परंतु हे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्यात नसल्याने देखील अपेक्षित मागणी नसल्याचे व्यापाºयांनी सांगितले.