दानातील आनंद सर्वोत्तम : डॉ. सुधा मूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:08 AM2021-06-04T04:08:55+5:302021-06-04T04:08:55+5:30
‘सिम्बायोसिसच्या सुवर्ण महोत्सवी ऑनलाइन व्याख्यानमालेत ‘देण्यातील आनंद’ या विषयावर डॉ. सुधा मूर्ती बोलत होत्या. या वेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष ...
‘सिम्बायोसिसच्या सुवर्ण महोत्सवी ऑनलाइन व्याख्यानमालेत ‘देण्यातील आनंद’ या विषयावर डॉ. सुधा मूर्ती बोलत होत्या. या वेळी सिम्बायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका सिम्बायोसिस व प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू, डॉ. रजनी गुप्ते उपस्थित होते.
डॉ. मूर्ती म्हणाल्या की, ‘पैसा ही सध्या सर्वांत महत्त्वाची अशी गोष्ट आहे, परंतु, प्रमाणाबाहेर असलेला पैसे हा नेहमीच नुकसानकारक ठरतो. त्यामुळे किती पैसे असावेत, याबद्दल प्रत्येकानेच लक्ष्मण रेषा आखायला हवी. पैशांचा अतिरेक हा तुमच्या पुढील पिढ्यांना निष्क्रिय करू शकतो. तसेच वाईट मार्गाला देखील नेऊ शकतो. त्यामुळे दान करावे, तसेच दान करण्यापूर्वी आपल्या कुटुंबातील सदस्यांची संमती घ्यावी.
डॉ. शां. ब. मुजुमदार म्हणाले की, कोरोनाने आपल्या सर्वांना अनेक सकारात्मक गोष्टी शिकवल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘एकत्र येणे’. आज कोरोनाशी लढण्यासाठी जगभरातील भिन्न देश एकत्र आले असून एकमेकांना मदत करीत आहेत.