आषाढीवारी होणार निर्मल
By admin | Published: May 12, 2017 05:16 AM2017-05-12T05:16:19+5:302017-05-12T05:16:19+5:30
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. यंदा महापालिकेच्या वतीने निर्मलवारी
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराममहाराज पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड शहरातून जातो. यंदा महापालिकेच्या वतीने निर्मलवारी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यात शहरात पाचशे मोबाईल टॉयलेट उभारण्यात येणार आहेत. पाणी, स्वच्छता आणि आरोग्य विषयक सुविधा देण्यात येणार असल्याचे आज झालेल्या बैठकीत निश्चित केले.
आषाढीवारी पालखी सोहळा नियोजनासाठी पालिकेत बैठक झाली. बैठकीस महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक नामदेव ढाके, कार्यकारी अभियंता एम. एम. चव्हाण, सतीश इंगळे, जयंत बरशेट्टी, प्रमोद ओंभासे, प्रवीण घोडे, विशाल कांबळे, सहायक आयुक्त चंद्रकांत इंदलकर, संदीप खोत, मिनिनाथ दंडवते, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, आशादेवी दुरगुडे, सहायक आरोग्याधिकारी एम. एम. शिंदे, व्ही. के. बेंडाळे, तुकाराम तनपुरे, रमेश ओतारी, प्रकाश मिर्झापुरे, सूर्यकांत बटसावडे, चंद्रकांत पवार, स्मिता डेरे, विनिता अंब्रेकर, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे सूर्यकांत मुथियान, शिवदास कोळी, आर. जी. फाटके, प्रभाकर धनोकर, रमेश जाधव, गणेश चौधरी, संदेश गोलांडे, रमेश सरदेसाई आदी उपस्थित होते.
आकुर्डी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशा पिण्याच्या पाण्याची, स्वच्छतागृहाची, पाण्याच्या टँकरची व प्रकाश योजनेची व्यवस्था करावी, अशा सूचना दिल्या. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना योग्य ती मदत करावी. पालखी सोहळा शांततेत व सुस्थितीत पार पाडण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. वारकरी व भाविक यांच्या संख्येनुसार स्वच्छतागृहांच्या संख्येत वाढ करावी. पालखी मार्गस्थ झाल्यावर रस्त्याची स्वच्छता करावी. पालखी सोहळ्या समवेत पाण्याचे टँकर व वैद्यकीय सेवा सुविधांसह रुग्णवाहिकेची व्यवस्था करून देण्याच्या सूचनाही केल्या.