मान्यवरांच्या मांदियाळीत ‘लोकमत’वर शुभेच्छांचा वर्षाव!
By Admin | Published: December 29, 2016 03:14 AM2016-12-29T03:14:45+5:302016-12-29T03:14:45+5:30
हजारो दीपमाळांनी उजळून निघालेली ‘लोकमत’ची वास्तू, तुतारीच्या निनादात होणारे स्वागत, शुभेच्छांचा वर्षाव, अशा स्नेहमय वातावरणाने ‘लोकमत’चा १७ वा वर्धापन दिन
पुणे : हजारो दीपमाळांनी उजळून निघालेली ‘लोकमत’ची वास्तू, तुतारीच्या निनादात होणारे स्वागत, शुभेच्छांचा वर्षाव, अशा स्नेहमय वातावरणाने ‘लोकमत’चा १७ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणात बुधवारी साजरा झाला. दमदार वाटचाल करणाऱ्या ‘लोकमत’वर पुण्यातील मान्यवरांच्या मांदियाळीत शुभेच्छांचा वर्षाव झाला.
राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक अशा विविध क्षेत्रांतील कर्तृत्वसंपन्न, दिग्गज मान्यवरांनी पुण्यात लोकमत नंबर एक झाल्याच्या अनेकांनी दूरध्वनीवरूनही शुभेच्छा दिल्या. वडगाव येथील लोकमत भवन मान्यवरांच्या मांदियाळीने अगदी फुलून गेले होते. स्नेहीजनांच्या या मेळाव्यात उपस्थित मान्यवर विविध विषयांवर गप्पांमध्येही रंगले होते.
महापौर प्रशांत जगताप, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, वंदना चव्हाण, आमदार अॅड़ जयदेव गायकवाड, माधुरी मिसाळ, मेधा कुलकर्णी, भीमराव तापकीर, बाळा भेगडे, राहुल कुल, उपमहापौर मुकारी अलगुडे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, रमेश थोरात, अशोक पवार, शहर कॉँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, विनायक निम्हण, पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, अतिरिक्त पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, अतिरिक्त पोलीस उपायुक्त शशिकांत शिंदे, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे, महापालिका आयुक्त कृणाल कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ वासुदेव गाडे, सिम्बायोसिसचे कुलपती डॉ़ शां़ ब़ मुजुमदार, भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ शिवाजीराव कदम, डॉ़ प्ऱ चिं़ शेजवलकर, डॉ़ के़ एच़ संचेती, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे, तुषार दोशी, दीपक साकोरे, पी़ आऱ पाटील, श्रीकांत पाठक, रेल्व पोलीस अधीक्षक प्रभाकर बुधवंत, राज्य राखीव पोलीस बलाचे पोलीस अधीक्षक सारंग आवाड, सहायक आयुक्त भानुप्रताप बर्गे, सुरेश भोसले, राजेंद्र भामरे, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. माधवी वैद्य, भारत देसडला, दीपक शिकारपूर, राजेश साकला, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, मनसेचे शहराध्यक्ष हेमंत संभुस, रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, उद्योजक अनिरुध्द देशपांडे, कृष्णकुमार गोयल, राजेश साकला, शांतीलाल मुथा, महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘लोकमत’ला शुभेच्छा दिल्या.
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार अमर साबळे, राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या़