ऑनलाइन प्रणालीवर भर देत शिक्षणक्षेत्राकडून नववर्षाचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:08 AM2021-01-01T04:08:09+5:302021-01-01T04:08:09+5:30

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. तर काहींवर उपासमारीची वेळ आली.परिणामी शहरात रोजगारासाठी आलेल्या नागरिकांचे मोठे स्थलांतर झाले. त्यामुळे शहरातील काही ...

Happy New Year from the education sector with an emphasis on online systems | ऑनलाइन प्रणालीवर भर देत शिक्षणक्षेत्राकडून नववर्षाचे स्वागत

ऑनलाइन प्रणालीवर भर देत शिक्षणक्षेत्राकडून नववर्षाचे स्वागत

Next

कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले. तर काहींवर उपासमारीची वेळ आली.परिणामी शहरात रोजगारासाठी आलेल्या नागरिकांचे मोठे स्थलांतर झाले. त्यामुळे शहरातील काही शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी झाली असून शाळांमधील तुकड्याही कमी झाल्या आहेत. परंतु, पुढील काही महिन्यात शाळा सुरू कराव्या लागणार आहेत. त्यासाठी शासनाच्या नियमावलींच्या अधिन राहून शाळा सुरू कराव्या लागतील. मात्र, कोरोना परिस्थिती सुधारणा झाली नाही तर डिजिटल स्कूलच्या उभारणीची गरज आहे. त्यासाठी शिक्षकांना तयारी करावी लागेल, असे मुख्याध्यापक संघटनेचे प्रवक्ता महेंद्र गणपुले यांनी सांगितले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरी डॉ. नितीन करमळकर म्हणाले, विद्यापीठाचे 40 टक्के विद्यार्थी वाणिज्य शाखेचे आहेत.त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच प्रशिक्षणाचा अनुभव मिळणार आहे.डायग्नॉस्टिक सेंटर उभारण्यावर भर दिला जाईल.युनिव्हर्शिलयजेशन आॅफ इंडियन ट्रॅशिनल नॉलेज सिस्टीम अंतर्गत विविध आॅनलाइन क्रेडिट अभ्यासक्रम तयार करण्याचे काम सुरू आहे.ज्वेलरी डिझाईन,डान्स थेअरपी, गिर्यारोहण आदी नावीन्य पूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत.

Web Title: Happy New Year from the education sector with an emphasis on online systems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.