रस्त्यावर बांधकाम साहित्याने टाकल्याने नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:10 AM2021-02-15T04:10:59+5:302021-02-15T04:10:59+5:30
कर्वेनगर : कोथरूड गुजरात कॉलनीमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर बाधंकाम चालु आहे. त्या बाधंकामाचे साहित्य सर्व ठिकाणी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले ...
कर्वेनगर : कोथरूड गुजरात कॉलनीमध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर बाधंकाम चालु आहे. त्या बाधंकामाचे साहित्य सर्व ठिकाणी रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून वाहने घसरून अपघात वाढत आहे. मात्र, महापालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र मगर यांनी केला आहे.
महापालिका नियमानुसार बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकण्यास परवानगी मिळत नाही. तसेच त्याला चाप बसण्यासाठी दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. मात्र त्याची अंमलबजावणी पालिका करत नसल्यामुळे हा नाहक त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
या बाधंकाम साहित्यामध्ये वीट, वाळू, खडी, दगडी, सिमेंट अशा प्रकारचे साहित्य रस्त्यावर विखुरले आहेत. त्यामुळे अपघात वाढले असून चालक जखमीही झाले आहेत. पण बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्यांना याबाबत कसलेही देणघेणे वाटत नाही. त्यामुळे नियमानुसार महापालिकेने दंडात्मक कारवाई करावी. साहित्य जप्त करावे, अशी मागणी मगर यांनी केली आहे. याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
फोटो :