विनयभंग केल्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:10 AM2021-03-10T04:10:47+5:302021-03-10T04:10:47+5:30

पुणे : मामेबहिणीसमवेत हापश्यावर पाणी भरण्यासाठी आलेल्या तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी आठ हजार ...

Hard labor for three for molestation | विनयभंग केल्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी

विनयभंग केल्याप्रकरणी तिघांना सक्तमजुरी

Next

पुणे : मामेबहिणीसमवेत हापश्यावर पाणी भरण्यासाठी आलेल्या तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. आय. शेख यांनी हा निर्णय दिला.

विठ्ठल सदाशिव शिंदे, बाबू गणपत इंगुळकर, रवींद्र लक्ष्मण राजणे (तिघेही रा. सुरवड, ता. वेल्हा, जि. पुणे) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत. दंडाच्या रकमेतून पाच हजार रुपये तरूणीला देण्यात यावेत, असेही आदेशात नमूद केले आहे.

२३ मार्च २०१६ रोजी ही घटना घडली. आरोपींनी तरूणीचा विनयभंग केला. याखेरीज, यापूर्वीही ती महाविद्यालयात जात असताना तिचा पाठलाग करून तिला त्रास देण्यात आला होता. यावेळी, गावामध्ये बैठक बोलावून वाद मिटविण्याचा प्रयत्न देखील झाला. मात्र, तरीही हा प्रकार न थांबल्याने तिने २४ मार्च २०२१ रोजी आरोपींविरोधात वेल्हा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार, आरोपींविरोधात भारतीय दंड विधान कलम ३५४ अ, ड सह कलम ५४ अन्वये गुन्हा दाखल करत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. नितीन कोंघे यांनी काम पाहिले. त्यांनी या प्रकरणात सात साक्षीदार तपासले. यामध्ये आरोपीतर्फे बचाव म्हणून एक साक्षीदार तपासण्यात आला.

--

Web Title: Hard labor for three for molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.