अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:09 AM2021-07-09T04:09:01+5:302021-07-09T04:09:01+5:30
श्रीमंत शांतय्या स्वामी (वय २४) याला ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड तर त्याचा मित्र शंकर ऊर्फ ...
श्रीमंत शांतय्या स्वामी (वय २४) याला ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड तर त्याचा मित्र शंकर ऊर्फ शिवशंकर सिधय्या स्वामी (वय २०, दोघेही रा. चिखली) यास ३ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
ही घटना १३ मे २०१९ रोजी चिखली परिसरातील श्रीमंत स्वामी याच्या घरात घडली होती. आरोपी हे पीडितेच्या घरासमोरील चाळीत राहत होते. घटनेच्या दिवशी संबंधित मुलगी ही श्रीमंत यास भेटण्यास गेली असता त्याने तिला घरात बोलाविले. या वेळी त्या ठिकाणी असलेला त्याचा मित्र शिवशंकर हा घराबाहेर निघून गेला. जाते वेळी त्याने घराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर श्रीमंत याने आपण दोघे लग्न करू यात असे म्हणत विनयभंग केला.
या खटल्यात विशेष सरकारी ॲड. अरुंधती ब्रम्हे यांनी ४ साक्षीदार तपासले. यू. बी. ओमासे यांनी या गुन्ह्याचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस नीलेश दरेकर यांनी सहकार्य केले.