कष्ट केल्याशिवाय यश नाहीच : भूषण गोखले; पुण्यात स्काऊट-गाईड पथकाचा शताब्दी वर्ष मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:12 PM2018-01-08T12:12:57+5:302018-01-08T12:16:44+5:30

आयुष्यात असे कार्य प्रत्येकाने करायला हवे, ज्यामुळे आपल्या आई-वडिलांना आणि देशाला अभिमान वाटेल, असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केले.  

hard work is a key of success : Bhushan Gokhale; scout-guide squad anniversary | कष्ट केल्याशिवाय यश नाहीच : भूषण गोखले; पुण्यात स्काऊट-गाईड पथकाचा शताब्दी वर्ष मेळावा

कष्ट केल्याशिवाय यश नाहीच : भूषण गोखले; पुण्यात स्काऊट-गाईड पथकाचा शताब्दी वर्ष मेळावा

Next
ठळक मुद्देस्वत:चा विचार करीत असताना समाजाचा देखील विचार करणे आवश्यक : भूषण गोखले मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला शंभर पतंग एकाच वेळी आकाशात उडवण्याची स्पर्धा

पुणे : आयुष्यात कष्ट केल्याशिवाय कोणत्याही कामात यश मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, हे ब्रीदवाक्य आयुष्यभर लक्षात ठेवले पाहिजे. स्काऊटिंगच्या माध्यमातून शिकलेल्या सर्व गोष्टी कायम लक्षात ठेवल्यास त्याचा भविष्यकाळात आजच्या पिढीला नक्कीच उपयोग होईल. आयुष्यात असे कार्य प्रत्येकाने करायला हवे, ज्यामुळे आपल्या आई-वडिलांना आणि देशाला अभिमान वाटेल, असे प्रतिपादन एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले यांनी केले.  
श्री शिवाजी कुल या पुण्यातील पहिल्या स्काऊट-गाईड खुल्या पथकाच्या शताब्दी वर्ष उद्घाटन मेळाव्याचे आयोजन सदाशिव पेठेतील पंतसचिव स्काऊट क्रीडांगण येथे करण्यात आले होते. या वेळी पक्षितज्ज्ञ किरण पुरंदरे, रमेश जोशी, संस्थेचे कुलमुख्य आदित्य धायगुडे, श्रेया मराठे, पुष्कर भराडिया, कुलसप्ताह समितीप्रमुख शिवाजी रोडे यांसह आजी व माजी कुलवीर, पालकवर्ग उपस्थित होते. कार्यक्रमात शतगौरवार्थींचा सन्मान, स्काऊटची प्रात्यक्षिके आणि ‘श्री शिवाजी कुल-खरी कमाई’ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. 
भूषण गोखले म्हणाले, ‘आयुष्यात कितीही मोठे यश संपादन केले, तरीसुद्धा आपले पाय जमिनीवर असणे आवश्यक आहे. तसेच स्वत:चा विचार करीत असताना समाजाचा देखील विचार करणे आवश्यक आहे.’ 

किरण पुरंदरे म्हणाले, ‘सह्याद्रीच्या डोंगररागांना भेटल्यावर निसर्गाची समृद्धी समजते. निसर्गाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत.’ कार्यक्रमात बालगटासह कब, बुलबुल, स्काऊट, गाईड विभागाची नयनरम्य प्रात्यक्षिके सादर झाली. 
कार्यक्रम कुलसप्ताह या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटनही झाले. रमेश जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. ऋषीकेश खाडे याने सूत्रसंचालन केले. अरुंधती जोशी हिने आभार मानले. 

पतंग उडवण्याचा उपक्रम 
यंदा संस्थेच्या कुलसप्ताह क्रीडा सप्ताहामध्ये एका नावीन्यपूर्ण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या शताब्दीनिमित्त शंभर पतंग एकाच वेळी आकाशात उडवण्याची स्पर्धा मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला १३ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता सदाशिव पेठेतील स्काऊट ग्राऊंडवर होणार आहे. यामध्ये लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील स्पर्धक सहभागी होणार आहेत. पुणेकरांनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 
 

Web Title: hard work is a key of success : Bhushan Gokhale; scout-guide squad anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे