खंडणीचे गुन्हे असणारा अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:12 AM2021-07-28T04:12:20+5:302021-07-28T04:12:20+5:30

हरीश कानसकर यांच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडणीचे गुन्हे दाखल होते. कानसकर हा अनेक दिवसांपासून फरार होता. पोलीस अधीक्षक ...

The hardened criminal with the crime of ransom is finally arrested | खंडणीचे गुन्हे असणारा अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद

खंडणीचे गुन्हे असणारा अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद

Next

हरीश कानसकर यांच्याविरोधात मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत खंडणीचे गुन्हे दाखल होते. कानसकर हा अनेक दिवसांपासून फरार होता. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी विशेष पथक नेमून हरीश कानसकर याचा शोध घेणे सुरू केले होते. कानसकर हा वेश बदलून फिरत असल्याने त्याला पकडण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. त्याचा शोध सुरू असताना पद्माकर हरीश कानसकर हा दातिवली दिवा,मुंबई या ठिकाणी राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे यांनी पथकासह जावून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव पत्ता हरीश महादू कानसकर (सद्या रा. दातिवली, दिवा, मुंबई मुळ रा. रांजणी, ता.आंबेगाव) असे सांगितले. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात माहिती देऊन पुढील तपास कामी कानसकर याला मंचर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीवर मंचर पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत.

चौकट

आठवड्यात पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना मंचर पोलिसांना हवा असलेला आरोपी हरीश कानसकर का सापडत नाही याविषयी विचारले असता त्यांनी पुढील एक ते दोन आठवड्यात नक्कीच तो पोलिसांच्या हाती येईल असे सांगितले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने हरीश कानसकर याला ताब्यात घेवून मंचर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस अनेक दिवसांपासून कानसकर याच्या मागावर होते. वेश बदलून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. मात्र आता तो पोलिसांच्या हाती लागला आहे.

Web Title: The hardened criminal with the crime of ransom is finally arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.