कोरेगाव भीमा येथील हरिनाम सप्ताह साधेपणाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:10 AM2021-03-23T04:10:48+5:302021-03-23T04:10:48+5:30
सप्ताह कमिटीने अत्यंत काळजीपूर्वक सप्ताहाचे आयोजन करत ग्रामस्थांच्या, वारकरी व भाविक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक उत्तरदायित्व राखत मर्यादित ...
सप्ताह कमिटीने अत्यंत काळजीपूर्वक सप्ताहाचे आयोजन करत ग्रामस्थांच्या, वारकरी व भाविक भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत सामाजिक उत्तरदायित्व राखत मर्यादित उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. रविवारी सकाळी राजू अगरवाल यांच्या हस्ते कलशपूजन करून अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात मोठ्या भक्तिमय वातावरणात करण्यात आली. हा सप्ताह दरवर्षी प्रमाणे मोठ्या प्रमाणात न होता अत्यंत छोट्या व मर्यादित स्वरूपात होणार आहे. रविवार २१ मार्च ते रविवार २८ मार्च वीणा जागर, पारायण, हरिपाठ, संगीत भजन नित्यनेमाने होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गर्दी टाळण्याच्या दृष्टीने कमीत कमी व मर्यादित उपस्थितीत या वर्षीचा सप्ताह सोहळा आयोजित करण्यात आला आहे .
तोंडाला मास्क व योग्य ती काळजी घेतल्यास मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे .
अखंड हरिनाम सप्ताहाचे माहिती पोस्टर मधुकर कंद यांनी हाताने बनवले असून ते अत्यंत आकर्षक व लक्षवेधक बनवले आहे. सदर प्रसंगी राजूशेठ अगरवाल, रावसाहेब फडतरे, श्रीनिवास जोशी उर्फ कर्डेकर काका, अर्जुन गव्हाणे, अशोक घावटे, ज्ञानेश्वर शिंदे, मधुकर कंद, रामदास गव्हाणे, बबन गव्हाणे, गव्हाणे वायरमन, पोलीस पाटील मलान गव्हाणे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
२२ कोरेगाव भीमा
कोरेगाव भीमा येथील अखंड हरिनाम सप्ताहाची सुरुवात करताना ग्रामस्थ.