श्रीवर्धनमधील हरवीत रोहिणी रस्ता खचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2018 03:30 AM2018-08-28T03:30:28+5:302018-08-28T03:30:56+5:30

वळणावर भगदाड : प्रवासी वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता

Harivar Rohini road in Shrivardhan lost | श्रीवर्धनमधील हरवीत रोहिणी रस्ता खचला

श्रीवर्धनमधील हरवीत रोहिणी रस्ता खचला

Next

श्रीवर्धन : जून महिन्यात पडलेल्या जोरदार पावसाने श्रीवर्धन तालुक्यातील शहरी व ग्रामीण रस्त्याची दुर्दशा झाली. तालुक्यातील दिघी बंदराच्या लगतचा हरवीत रोहिणी रस्ता खचण्यास सुरुवात झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी हे महत्त्वाचे बंदर आहे. दिघी ते म्हसळा वाहतुकीचे दोन मार्ग उपलब्ध आहेत. बंदराची अवजड वाहतूक म्हसळा गोंनघर मार्गे वडवली कुडगाव ते दिघी होते. दुसरा मार्ग म्हसळा मेंदडी मार्गे रोहिणी हरवीत ते दिघी असा आहे.

हरवीत मार्गावरून विशेषत: प्रवासी वाहतूक केली जाते. हरवीत, रोहिणी, तुरु बाडी, काळसुरी, वारळ या गावांच्या दळणवळणासाठी हरवीत म्हसळा रस्ता महत्त्वाचा आहे. आजमितीस हरवीत गावाच्या हद्दीत मुख्य रस्त्याच्या वळणावर भगदाड पडले आहे, तसेच पावसाचे पाणी वाहून नेणाऱ्या मोरीचे दगड निघण्यास सुरु वात झाली आहे. वेळीच बांधकाम खात्याने सदर रस्त्याकडे लक्ष न दिल्यास हरवीत मार्गे होणारी प्रवासी वाहतूक बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
हरवीत गावाची लोकसंख्या ८५० च्या जवळपास आहे. शालेय विद्यार्थी व मच्छी विक्रे ते यांची वाहतूक सदर मार्गावर जास्त प्रमाणात चालते. दिघी हरवीत मार्गे म्हसळा ३0 किमी अंतर आहे. हरवीत रस्त्याची अंदाजे रु ंदी १६ फूट आहे. रस्त्यावर वाहतूक निरंतर चालू आहे. एसटी महामंडळाच्या बसच्या फेºया सदर मार्गावर नियमित चालू आहेत, मात्र मुख्य रस्त्यावर पडलेले भगदाड वाढल्यास वाहतूक बंद होण्याचा शक्यता आहे. हरवीत मार्गे म्हसळा मार्गावरून नियमित अंदाजे २५० विद्यार्थी मेंदडी व म्हसळा येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी जातात. दिघी व हरवीतच्या विद्यार्थी वर्गास पर्यायी मार्ग म्हणून वडवली गोंनघर मार्ग उपलब्ध आहे, परंतु सदरचा मार्ग विद्यार्थ्यांसाठी आर्थिक भुर्दंड देणारा आहे.बांधकाम खात्याने वेळीच हरवीत रस्त्याकडे लक्ष न दिल्यास सदरच्या विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते.

हरवीत रस्त्याविषयी ‘लोकमत’कडून मला माहिती मिळत आहे. सदरच्या रस्ता दुरवस्थेसंदर्भात कुठलीही माहिती कळवण्यात आली नव्हती. ‘लोकमत’ कडून दिलेल्या माहितीनुसार तत्काळ योग्य ती कार्यवाही केली जाईल. जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची बांधकाम खात्याकडून व्यवस्था होईल.
- पी.टी. जेट्टे, अभियंता,
सार्वजनिक बांधकाम खाते, श्रीवर्धन

हरवीत गावाच्या हद्दीत वळण रस्त्यावर मोरीच्या वरती रस्त्यावर खड्डा पडला आहे.त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करत आहे.
- प्रवीण देविदास ढोरे, ग्रामसेवक, हरवीत ग्रामपंचायत

Web Title: Harivar Rohini road in Shrivardhan lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.