पुण्याच्या हर्षदा गरुडची उत्तुंग भरारी; ग्रीसमध्ये ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत पटकवले 'सुवर्णपदक' 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2022 06:25 PM2022-05-02T18:25:37+5:302022-05-02T18:30:21+5:30

सुवर्ण पदक मिळवून पुण्याचे नाव पुन्हा एकदा जागतिक नकाशावर झळकवले

Harshada Garuda of Pune Greece wins gold medal at Junior World Weightlifting Championships | पुण्याच्या हर्षदा गरुडची उत्तुंग भरारी; ग्रीसमध्ये ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत पटकवले 'सुवर्णपदक' 

पुण्याच्या हर्षदा गरुडची उत्तुंग भरारी; ग्रीसमध्ये ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत पटकवले 'सुवर्णपदक' 

Next

वडगाव मावळ : ग्रीस येथे सुरु असलेल्या ज्युनिअर जागतिक वेटलिफ्टींग स्पर्धेत वडगांव मावळ येथील दूबेज गुरुकुलची खेळाडू हर्षदा शरद गरुड हिने 45 किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवून पुण्याचे नाव पुन्हा एकदा जागतिक नकाशावर झळकवले. गेल्या चार दिवसापूर्वीच तीची भारतीय संघात निवड झाली आहे.                                                            

हर्षदा शरद गरुड वडगांव मावळ येथील दुबेज गुरुकुल मध्ये बिहरीलाल दुबे यांच्याकडे सराव करत असून 2019 मधे ताशकंद येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर स्पर्धेत तिने कास्य पदक मिळविले होते. हर्षदाने तिची निवड योग्य असल्याचे सिद्ध केल्याबद्दल बिहारीलाल दुबे यांनी आनंद व्यक्त केला. मावळ परिसरात हर्षदा सारखे अनेक हिरे आहेत. त्यांना प्रोत्साहन आणि सहकार्य केले तर तालुक्यावर सुवर्ण पदकांचा पाऊस पडेल असा विश्वास दुबे यांनी व्यक्त केला. तसेच मावळ तालुक्यात  वेटलिफ्टींग खेळाचे  अद्यायावत ट्रेनिंग सेंटर नसल्याची खंतही पुन्हा एकदा  त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Harshada Garuda of Pune Greece wins gold medal at Junior World Weightlifting Championships

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.