हर्षवर्धन पाटील यांनी पालखी मार्ग विकासाचे श्रेय लाटू नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:11 AM2021-04-08T04:11:35+5:302021-04-08T04:11:35+5:30
इंदापूर : संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी मार्ग विकसित करण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला ...
इंदापूर : संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज पालखी मार्ग विकसित करण्यासाठी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेला निधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे व राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नामुळे मिळाला पालखी मार्गाच्या निधीचे श्रेय हर्षवर्धन पाटील यांनी लाटण्याचे काम थांबवावे, असा मौलिक सल्ला पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
प्रदीप गारटकर म्हणाले, नवी दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी मी स्वतः व दत्तात्रय भरणे आम्ही दोघे नितीन गडकरी यांना भेटायला गेलो होतो.
भेटीदरम्यान दत्तात्रय भरणे यांनी पालखी मार्ग विकासासाठी एक निवेदन नितीन गडकरी यांना दिले होते. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला. पालखी मार्ग कामासंदर्भात झालेल्या तरतूदची घोषणा झाली. सदर कामाचे श्रेेय लाटण्याचे काम माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील करत आहेत. संदर्भात अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत.
हर्षवर्धन पाटील हे एक वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांचा पालखी मार्ग कामासंदर्भात काही संबंध नाही. तालुक्यातील इतर कामासाठी हर्षवर्धन पाटील यांनी नितीन गडकरी यांच्याकडून कोणतेही केंद्राच्या योजनेमधूून निधी आणावा आम्ही निश्चित स्वागत करू, असे आवाहन प्रदीप गारटकर यांनी हर्षवर्धन पाटलांना दिले.
विरोधकांनी राजकारणासाठी विरोध करणे थांबवावे
विरोधकांचे विकास कामांचे श्रेय लाटण्याचे प्रयत्न जनतेला पचनी पडणार नाही. राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे विकास निधी खेचून आणण्यासाठी प्रचंड कष्ट आहेत. केंद्र सरकारची काहीतरी योजना इंदापूर तालुक्यासाठी आणावे, मग विरोधकांनी जनतेला सांगावे, उगाच राजकारणासाठी विरोध करणे थांबवावे, असाही मोलाचा सल्ला प्रदीप गारटकर यांनी दिला.
यावेळी तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे, हनुमंत कोकाटे, वसंत आरडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.