हर्षवर्धन पाटील यांचा कर्मयोगी कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:10 AM2021-09-24T04:10:59+5:302021-09-24T04:10:59+5:30

कर्मयोगी कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या चालू असून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्ती उत्पादक कालठण ...

Harshvardhan Patil's candidature application filed for Karmayogi Karkhana election | हर्षवर्धन पाटील यांचा कर्मयोगी कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

हर्षवर्धन पाटील यांचा कर्मयोगी कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

Next

कर्मयोगी कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सध्या चालू असून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष, राज्याचे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्ती उत्पादक कालठण गट आणि ब वर्ग संस्था सभासद प्रतिनिधी या दोन्ही मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. इंदापूरचे तहसीलदार व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत पाटील, सहायक निबंधक जिजाबा गावडे यांनी अर्ज स्वीकारला.

यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, उदयसिंह पाटील, मयूरसिंह पाटील, लालासाहेब पवार, राजवर्धन पाटील, ॲड. कृष्णाजी यादव, कांतीलाल झगडे, देवराज जाधव, माऊली बनकर, बाळासाहेब पाटील, अशोक इजगुडे, शकील सय्यद, महादेव घाडगे, गोरख शिंदे, कैलास कदम, बापू जामदार, रंजना शिंदे व पदाधिकारी उपस्थित होते.

या पंचवार्षिक निवडणुकीसाठी हर्षवर्धन पाटील यांनी नेहमीप्रमाणे जय्यत तयारी केली आहे. इच्छुक कार्यकर्त्यांमधून या निवडणुकीसाठी तसेच आगामी काळात होणाऱ्या विविध संस्थांच्या निवडणुकीसाठी सक्षम कार्यकर्त्यांना सामावून घेण्याचे त्यांचे नियोजन आहे.

सध्या कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखाना अडचणीतून बाहेर येत असून कारखान्याची परिस्थिती सुधारत आहे. दरम्यान, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे.

___________________________________________________

फोटो क्रमांक - २३ कर्मयोगी कारखाना हर्षवर्धन

फोटो ओळ : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना

Web Title: Harshvardhan Patil's candidature application filed for Karmayogi Karkhana election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.