साखर उद्योगासंदर्भात केंद्रीय मंत्री दानवे यांच्याशी हर्षवर्धन पाटील यांची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:11 AM2021-01-20T04:11:30+5:302021-01-20T04:11:30+5:30
केंद्र सरकारने साखरविक्रीची किंमत किमान ३४०० रुपये करावी, एनसीडीसी व एसडीएफकडील साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करावे, यासह साखर उद्योगातील ...
केंद्र सरकारने साखरविक्रीची किंमत किमान ३४०० रुपये करावी, एनसीडीसी व एसडीएफकडील साखर कारखान्यांच्या कर्जाचे पुनर्गठण करावे, यासह साखर उद्योगातील अनेक विषयांवरती याप्रसंगी चर्चा झाली. यावेळी इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्ली (इस्मा) च्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील उपस्थित होत्या.
या वेळी दानवे म्हणाले की, साखर उद्योगातील अडचणींसंदर्भात दिल्लीत लवकरच बैठक घेतली जाईल, केंद्र सरकार साखर उद्योगाला सहकार्य करण्यासंदर्भात सकारात्मक असल्याचे या वेळी दानवे यांनी स्पष्ट केले.
--
चौकट : साखरेच्या मासिक कोट्यात अचानक वाढ नको
केंद्र सरकारकडून अनेकवेळा कारखान्यांना दिल्या जाणाऱ्या साखरेच्या मासिक कोट्यामध्ये अचानकपणे वाढ केली जाते, त्यामुळे बाजारामध्ये साखर मोठ्या प्रमाणावर येऊन दरात घसरण होते. तसेच काही वेळेला व्यापारी टेंडरही भरत नाहीत त्यामुळे केंद्र सरकारने साखरेच्या मासिक कोट्यात अचानकपणे वाढ करू नये, असे मत हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
--
फोटो क्रमांक : १९ इंदापूर दानवे-पाटील भेट
फोटो ओळ : पुणे येथे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी साखर उद्योगासंदर्भात चर्चा केली.