स्वतंत्र भाषा संकुलाच्या मागणीसाठी ‘हॅश टॅग’ मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2021 04:13 AM2021-01-03T04:13:38+5:302021-01-03T04:13:38+5:30
विद्यापीठाच्या स्थापनेपासून मराठी विभागाला विद्यापीठ प्रशासनाकडे स्वत:च्या विस्तारासाठी प्रस्ताव सादर करावा लागला. त्यातील काही कुलगुरूंनी विद्यापीठात भाषा भवन निर्मितीच्या ...
विद्यापीठाच्या स्थापनेपासून मराठी विभागाला विद्यापीठ प्रशासनाकडे स्वत:च्या विस्तारासाठी प्रस्ताव सादर करावा लागला. त्यातील काही कुलगुरूंनी विद्यापीठात भाषा भवन निर्मितीच्या दृष्टीने सकारात्मकता दाखवली. मात्र, त्यादृष्टीने हालचाली झाल्या नाहीत. पूर्वी विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून विषय समजून सांगता आले पाहिजेत, असा आग्रह धरला जात होता. त्यासाठी अमराठी भाषिक प्राध्यापकांची मराठी विषयाची परीक्षा घेतली जात होती. परंतु, आता विद्यापीठाला मराठीचे महत्व वाटत नसल्याचे दिसून येत आहे.
विद्यापीठात व विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये पीएच.डी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठात स्वतंत्र भाषा संकुल व्हावे. यासाठी शनिवारी फेसबुक व ट्विटरवर ‘हॅश टॅग’ मोहित सुरू केली आहे. माजी संमेलनाध्यक्ष, विद्यार्थी संघटना, मराठी अभ्यास मंडळाचे पदाधिकारी यांच्यानंतर आता संशोधक विद्यार्थी स्वतंत्र भाषा संकुलासाठी पुढे सरसावले आहे.
-----
वर्तमान काळात मराठी भाषेची होत असलेली हेळसांड पाहता जागतिकरणात विद्यापीठाने स्वतंत्र मराठी भाषा संकुल निर्मितीला उत्तेजन देणे काळाजी गरज आहे.विद्यापीठाच्या मुळ संहितेमध्ये मराठी भाषेला व भाषा व्यवहाराला प्राधान्य दिल्याचे दिसते. त्यामुळे विद्यापीठाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन दिल्यास मराठी भाषेतील ज्ञान वृध्दिंगत होण्यास मदत होईल.
- नागनाथ बळते, संशोधक विद्यार्थी