हसन बदामी, आकाश रामटेके उपांत्यपूर्व फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:10 AM2021-03-22T04:10:23+5:302021-03-22T04:10:23+5:30
पुणे : क्यू बार अँड कॉर्नर शॉट स्नूकर करंडक अजिंक्यपद खुल्या स्नूकर स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू हसन बदामी व पुण्याच्या ...
पुणे : क्यू बार अँड कॉर्नर शॉट स्नूकर करंडक अजिंक्यपद खुल्या स्नूकर स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू हसन बदामी व पुण्याच्या आकाश रामटेके यांनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
हडपसर येथील अमानोरा मॉल येथील क्यू बार अँड कॉर्नर स्नूकर क्लब येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीमध्ये हसन बदामी याने यश खोेटे याचा ३-१ असा सहज पराभव केला. यश याने सामन्यात सुरेख सुरूवात करत पहिली फ्रेम ३७-०४ अशी जिंकली. पण दुसऱ्या फ्रेममध्ये हसन याने क्यू बॉलवर नियंत्रण मिळवताना सलग तीन फ्रेम ३७-२४, ३२-३०, ४५-०० अशा जिंकल्या. याच फेरीच्या आणखी एका सामन्यात आकाश रामटेके याने साद सय्यद याचा ३-१ (१३-३६, ३६-०८, ३७-२५, ४१-३९) असा सहज पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली.
दुसऱ्या फेरीच्या सामन्यात अभिषेक बजाज याने उमेश प्रजापती याचा ३-१ (५८-११, ४१-१९, १५-५४, ३१-२०) असा सहज पराभव करून आगेकूच केली. चुरशीच्या झालेल्या सामन्यात विजय नचानी याने करण मकवाना याचा ३-२ असा संघर्षपूर्ण पराभव करून तिसरी फेरी गाठली.
अनुज खाटेड, कैवल्य जाधव आणि गौरव देशमुख या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स्पर्धेचा सविस्तर निकालः पहिली फेरीः
अनुज खाटेड वि.वि. आरव संचेती ३-२ (५२-२४, २१-३१, २४-३२, ३३-८, ३५-२५);
कैवल्य जाधव वि.वि. दर्शन गजभिये ३-१ (२२-२५, ३४-२०, ३२-१३, ४०-८);
गौरव देशमुख वि.वि. चंद्रशेखर एस. ३-० (३९-१३, ३७-०१, २४-१३);
दुसरी फेरीः
साद सय्यद वि.वि. कैवल्य जाधव ३-२ (४३-८, २६-४८, ३६-२१, ००-३९, २४-४९);
अभिषेक बजाज वि.वि. उमेश प्रजापती ३-१ (५८-११, ४१-१९, १५-५४, ३१-२०);
विजय नचानी वि.वि. करण मकवाना ३-२ (१०-३९, ४९-००, ४४-०५, २७-४१, ४२-०९);
तिसरी फेरीः हसन बदामी वि.वि. यश खोेटे ३-१ (०४-३७, ३७-२४, ३२-३०, ४५-००);
आकाश रामटेके वि.वि. साद सय्यद ३-१ (१३-३६, ३६-०८, ३७-२५, ४१-३९);
(फोटो - अनुज खाटेड)